Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी इराकच्या फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जखमी

इराकच्या फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जखमी

Subscribe

इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये आणखी एक भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात 10 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून २० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण इराकमध्ये खळबळ उडाली आहे.

इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये आणखी एक भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात 10 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून २० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण इराकमध्ये खळबळ उडाली आहे. (bomb blast near football stadium in Baghdad Iraq 10 people killed)

इराकमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा बॉम्बहल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. या हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असला तरी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बगदादच्या पूर्व भागात असलेल्या एका फुटबॉलच्या मैदानालगत गॅरेजमध्ये आणि एका टँकरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. एका गाडीमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर जवळच असलेल्या गॅस टँकरमध्येही स्फोट झाला. त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी आलेल्या लोकांचा समावेश आहे. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी इराकच्या पोलिसांनी धाव घेतली. तसेच, सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. अचानक झालेल्या या स्फोटानंतर नेमके काय झाले हे कुणाला समजले नाही. परंतु मोठा आवाज झाल्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरल्यानंतर लोकांची एकच धावपळ उडाली.


- Advertisement -

हेही वाचा – अमरावतील दुमजली इमारत कोसळली; 5 जणांचा मृत्यू; दोन जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -