घरताज्या घडामोडीपाकिस्तानातील लाहोरमध्ये दहशतवादी हाफीज सईदच्या घराबाहेर मोठा स्फोट,१२ जण जखमी

पाकिस्तानातील लाहोरमध्ये दहशतवादी हाफीज सईदच्या घराबाहेर मोठा स्फोट,१२ जण जखमी

Subscribe

जखमींना लाहोरमधील जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

पाकिस्तानातील लाहोरमध्ये दहशतवादी हाफीज सईदच्या (Hafiz Saeed )घराबाहेर मोठा स्फोट झाला आहे. ( bomb blast outside the home of terrorist Hafiz Saeed in Lahore Pakistan) दहशतवादी हफीज सय्यद राहत असलेल्या जोहार टॉवरच्या जवळच्या परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात आतापर्यंत १२ जण जखमी ( injured 12 people) झाले असून त्यात काही महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना लाहोरमधील जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  स्फोटात कोणतीही जिवीन हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. या भीषण स्फोटात लाहोरमधीन अनेक घरांच्या खिकड्यांच्या काचा आणि भिंती पडून मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पाकिस्तानी डॉन न्यूजने दिली आहे. हा स्फोट करण्यामागचा उद्देश अद्याप समोर आलेला नाही. हाफीज सईदला चेतावणी देण्याच्या हा प्रयत्न होता की हाफीज सईदला थेट मारण्याचा प्लॅन होता का असा प्रश्न सर्वांसमोर आहे.


हफीज सईद हा भारताच्या मोस्ट वॉन्टेट लिस्ट मधील आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या देखील हिट लिस्टमध्ये हफीज सईदचे नाव आहे. त्यांच्यात बऱ्याच वेळा चकमकी सुरु असतात.  आजच केलेल्या स्फोटमध्ये हफीज सईद हा टार्गेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हा एखाद्या देशाचा मिलिट्री ऑपरेशनचा भाग असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

स्फोट झाला त्यावेळीस हफीज सईद घरीच होता. हफीज सईदच्या घराजवळील संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून ही भीषण स्फोट करण्यामागे नक्की कोण आहे? कोणत्या प्रकारचा हा स्फोट होता यासर्वांची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे. ISI त्याचप्रमाणे लष्कर ए तोयबा यांच्याकडून देखील जास्त खबरदारी घेतली जाणार आहे. ISI कडून या स्फोटाची संपूर्ण माहिती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – दुबईला जाण्याचा प्लॅन करताय? तर ‘या’ लसींचे डोस घेणे गरजेचे; वाचा नवीन गाईडलाईन

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -