घरताज्या घडामोडीBomb Cyclone : अमेरिकेत 10 राज्यात बर्फाच्या 'बॉम्ब' वादळाचे संकट ; तिन्ही...

Bomb Cyclone : अमेरिकेत 10 राज्यात बर्फाच्या ‘बॉम्ब’ वादळाचे संकट ; तिन्ही मार्गावरील वाहतूकसेवा ठप्प

Subscribe

अमेरिकेसारख्या महासत्ता देश बर्फाच्या वादळाने कोलमडला आहे. या बर्फाळ वादळात सुमारे 7 कोटी लोक अडकली आहेत. अमेरिकेतील 10 राज्यांना या बर्फाच्या वादळाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय या अमेरिकासारख्या बलाढ्य देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थैमान घालणाऱ्या वादळाचे नाव 'बॉम्ब' असे आहे. या वादळामुळे न्यूयॉर्कमध्ये बर्फाचा थर साचला आहे.

अमेरिकेसारख्या महासत्ता देश बर्फाच्या वादळाने कोलमडला आहे. या बर्फाळ वादळात सुमारे 7 कोटी लोक अडकली आहेत. अमेरिकेतील 10 राज्यांना या बर्फाच्या वादळाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय या अमेरिकासारख्या बलाढ्य देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थैमान घालणाऱ्या वादळाचे नाव ‘बॉम्ब’ असे आहे. या वादळामुळे न्यूयॉर्कमध्ये बर्फाचा थर साचला आहे. तर अमेरिकेतील किनारपट्टी भागात बर्फाचा थर हा एक फूटपर्यंत साचला आहे.
न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये वीज गायब झाली आहे. अमेरिकेतील सुमारे सव्वा लाख घरांची वीज गायब आहे. या वादळामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

हे बर्फाचे वादळ गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे बर्फाचे वादळ आहे. त्यामुळे हवामानाशी संबंधित अनेक अलर्ट जारी करण्यात आले आहेत. लोकांना वीजपुरवठा खंडित होण्याचाही सामना करावा लागत आहे.एका वृत्तानुसार, अमेरिकेतील या बर्फाच्या वादळाचा सर्वाधिक परिणाम न्यूयॉर्क आणि बोस्टनसारख्या पूर्वेकडील शहरांवर झाला आहे. यासोबतच न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि बोस्टनमध्ये प्रशासनाकडून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

न्यूयॉर्क, बोस्टन आणि न्यू जर्सीमध्ये लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बर्फाच्या वादळामुळे शनिवारी अमेरिकेत 3500 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.बोस्टनमध्ये स्नो इमरजन्सी घोषित करण्यात आले आहे.  त्याचवेळी, नॅशनल वेदर सर्व्हिसने फ्लोरिडातील लोकांसाठी अलर्ट घोषित केला आहे. त्याचवेळी बर्फाच्या वादळात कारमध्ये एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. दरम्यान, रस्त्यांवर साचलेला बर्फ काढण्याचे काम सुरु आहे.


हे ही वाचा – देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल –  नाना पटोले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -