Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश इराकची राजधानी बगदादमध्ये बॉम्बस्फोट; २५ जणं ठार, अनेक जखमी

इराकची राजधानी बगदादमध्ये बॉम्बस्फोट; २५ जणं ठार, अनेक जखमी

Related Story

- Advertisement -

इराकची राजधानी बगदादच्या उपनगरामध्ये सोमवारी बॉम्बस्फोट हल्ल्याची घटना घडली. या झालेल्या बॉम्बस्फोटात २५ जण ठार आणि कित्येक जण जखमी झाले, अशी माहिती इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. इराकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शहरातील गर्दीच्या बाजारपेठेत हा स्फोट झाला. ईद-उल-अजहाच्या एक दिवस आधी हा स्फोट झाला होता. या दिवशी लोकं बाजारात ईदची खरेदी करण्यात व्यस्त होते.

या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही, परंतु यापूर्वी झालेल्या भागात अशाच हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी एप्रिलमध्ये, या शहरात कार बॉम्बस्फोटात कमीतकमी चार लोक ठार झाले होते. इराकच्या लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी बाजारपेठेच्या क्षेत्रासाठी जबाबदार असलेल्या फेडरल पोलिस रेजिमेंटच्या कमांडरला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याचा तपास केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या स्फोटात महिला व मुलांचाही मृतदेह आढळल्याचे त्यांनी सांगितले. इराकच्या सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की या शहरातील वहाईलत बाजार येथे हा हल्ला झाला.


शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरणाचा आरोप
- Advertisement -