घरCORONA UPDATELockDown: पुस्तकं, पंख्यांची दुकानं सुरू होणार; मोबाईल रिचार्ज घर बसल्या मिळणार

LockDown: पुस्तकं, पंख्यांची दुकानं सुरू होणार; मोबाईल रिचार्ज घर बसल्या मिळणार

Subscribe

जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनासह आता पंख्यांची आणि पुस्तकांचीही दुकानं सुरू होतील, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी दिले.

दररोज देशातील कोरोनासंबंधातील माहिती, त्यांची रोजची आकडेवारी ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितली जाते. मात्र आज त्यांच्या पत्रकार परिषदेची सुरू काहीशी वेगळी झाली. नेहमी कोरोनाग्रस्तांच्या संबंधीत माहिती देणाऱ्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंबाबत दिलासादायक माहिती दिली. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनासह आता पंख्यांची आणि पुस्तकांचीही दुकानं सुरू होतील, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी दिले. सध्या उन्हाळ्याच्या ऋतुला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय सरकरानेही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एसी बंद ठेवून पंख्याचा वापर करण्याचे सुचवले आहे. अशावेळी पंखा नसलेल्यांसाठी तसेच पंखा बिघडल्यास तो दुरूस्त करण्यासाठी त्याची दुकानं उघडी असावीत, हा त्यामागील उद्देश समजला जात आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने दिले निर्देश 

केंद्राने प्रत्येक राज्यांना असे निर्देश दिले आहेत की ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत अशा ठिकाणी औषधं जीवनावश्य वस्तूंचा पुरवठा घरपोच करावा. तसेच त्यांचे मोबाईल रिचार्जदेखील घरच्या घरी करता येतील सुविध त्यांना द्यावी, याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली. शिवाय आज असलेल्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत सहाय्यक सचिवांनी लोकांना लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पुस्तकाचा आनंद घेता यावा, याकरता पुस्तकांनीही दुकानं सुरू करावीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या लोकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

याही वस्तू जीवनावश्यकचं 

सध्या लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्य वस्तू जसे अन्नधान्य, भाजीपाला, दुध आणि औषधं यांनी दुकानं सुरू आहेत. तसेच देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्तही लोकांना घरामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पंखा, लाईट, केबल, टेलिफोन, मिक्सर यांच्यातील तांत्रिक बिघाडाकरता इलेक्ट्रिशन उपलब्ध नाही. नळातून पाणी गळती, नळ फिटींग याकरता प्ल्मंबर नाहीत. इतकच काय तर टीव्हीच्या रिमोटचे सेल संपल्यास देखील उपलब्ध होत नाहीत. अशावेळी घरातील छोट्या छोट्या गोष्टीची दुरूस्ती करणाऱ्यांची दुकानं उघडल्यास लॉकडाऊनच्या काळात ते सर्व नागरिकांना सोईचे होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या या मोजक्या सोई त्याची सुरूवात असल्याचे म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus Crisis: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै २०२१ पर्यंत स्थगित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -