Covid-19 booster dose: सावधान! बूस्टर डोसही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर, OTPचा फंडा वाचा

सोशल मीडियावर सध्या एक मॅसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बूस्टर डोसच्या नावाखाली सायबर ठगांकडून ओटीपी मागितला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. हे नेमके प्रकरण काय आहे? वाचा

booster dose scam you may asked for otp be alert it is a new cyber fraud
Covid-19 booster dose: सावधान! बूस्टर डोसही सायबर गुन्हेगारांच्या रडारवर, OTPचा फंडा वाचा

कोरोनाच्या वाढत्या केसेस दरम्यान सरकारने फ्रंटलाईन वर्कर्ससाठी बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. काल, सोमवारपासून देशभरात बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु यादरम्यान आता सायबर ठग सक्रीय झाले आहेत. सायबर ठगांचे बूस्टर डोस आता नवे हत्यार झाले आहे. ट्विटरपासून फेसबुक ते व्हॉट्सअॅपपर्यंत एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, सायबर ठग बूस्टरच्या नावाखाली लोकांना चुना लावू शकतात.

व्हायरल मॅसेजमध्ये लिहिले आहे की, सर्वसामान्यांना फोन करून बूस्टर डोसची त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. यामध्ये बूस्टर डोस देण्याबाबत बोलले जाते. जर तुम्ही बूस्टर डोस घेऊ इच्छित असाल तर ते तुम्हाला मदत करतात. बूस्टर डोससाठी संपूर्ण माहिती घेतात आणि मग तुम्हाला एक ओटीपी येतो. जर तुम्ही हा ओटीपी देता तर तुमची फसवणूक होऊ शकते. दरम्यान कोविनद्वारे कोणाकडूनही अशाप्रकारे माहिती मागितली जात नाही. त्यामुळे जर कोणी बूस्टर डोससाठी माहिती मागत असेल तर सावध राहा, कोणताही ओटीपी शेअर करू नका.

या मेसेजला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. तसेच याप्रकरणाच्या फसवणुकीबद्दल आतापर्यंत युझरने काहीही सांगितले नाही. हा मॅसेज चांगलाच सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी हा मॅसेज शेअर केला आहे. डॉक्टर डीके गुप्ता यांनीही हा मॅसेज ट्विटरवर शेअर केला आहे. डीके गुप्ता हे फेलिक्स हॉस्पिटल नोएडाचे अध्यक्ष आहेत.


हेही वाचा – हेल्मेट, मास्क, जॅकेट परिधान करुन कर्मचार्‍याने केली ऑफिसमध्ये चोरी