घरदेश-विदेशब्रिटनचे बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर, ऋषी सुनक विजयाच्या दिशेने

ब्रिटनचे बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर, ऋषी सुनक विजयाच्या दिशेने

Subscribe

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्यास नकार दिला आहे. पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी त्यांना पुरेशा खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे भारतीय वंशाचे ऋषी सुनत यांचा ब्रिटनचे पंतप्रधान होण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. जॉन्स यांनी एका निवेदनात म्हटले की, मी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांसह निवडणुकीत यशस्वी होण्याची खूप चांगली संधी आहे. परंतु हे असे करणे योग्य होणार नाही कारण सुनक यांना अधिक पाठींबा आहे. (boris johnson out of for next brotain prime minister race rishi sunak close to victory)

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी जाहीर केले की, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्त्वासाठी निवडणूक लढवणार नाही, कारण आघाडीवर असलेले ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्याच्या जवळ आले आहेत. परंतु माजी 55 वर्षीय नेत्याने दावा केला की, त्यांनी 100 खासदारांचा टप्पा पार केला आहे. परंतु टोरी ऐक्याच्या हितासाठी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतली, तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या दुसऱ्या नेत्याची निवड केली जाणार आहे. मात्र या पक्षात सध्या मतभेद सुरु आहेत. यामुळे बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. जॉन्सन यांनी आपल्या निर्णयाबद्दल सांगितले की, जोपर्यंत संसदेत तुमचा पक्ष एकसंघ नाही तोपर्यंत तुम्ही प्रभावीपणे शासन करु शकत नाही, त्यामुळे या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडणे योग्य राहिल.

लिझ ट्रस यांनी 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. यामुळे देशात पुन्हा पंतप्रधान निवडण्याची गरज आहे. ब्रिटन पंतप्रधान शर्यतीत अनेक नावं घेतली जातात, मात्र यात दोन नावं आघाडीवर आहेत, यात भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव होत. मात्र बोरिस जॉन्सन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. ऋषी सुनक यांच्याकडे त्याहून अधिक खासदारांचा पाठिंबा आहे.


दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का?, केसरकरांचा ठाकरेंना प्रतिप्रश्न


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -