घरदेश-विदेशतलावात गेला मासे पकडायला, मिळाले असे काही की झाला हैराण...

तलावात गेला मासे पकडायला, मिळाले असे काही की झाला हैराण…

Subscribe

असा प्रकार दोनदा घडल्याने पोलिसांसह गावकऱ्यांची चिंता वाढली असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील आरुद या गावात सोमवारी एक अजब घटना उघडकीस आली. मासेमारीसाठी गेलेल्या मुलाने तलावातील पाण्यात आपले जाळे टाकले, त्यावेळी त्याच्या जाळ्यात मासे न येता चक्क नोटांचा बंडल आल्याचा प्रकार समोर आला. यावेळी पाचशे व दोन हजारांच्या नोटा मुलाच्या हाती लागल्या, ज्याची रक्कम साधारण २० हजार रुपयांच्या बरोबरीची होती.

एकीकडे कोरोनाचे सावट असताना खंडवा जिल्ह्यात अचानक तलावात नोटा दिसल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. तलावामध्ये या नोटा कशा आल्यात आणि कोणी फेकल्या असाव्यात याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. पाच-पाचशेच्या नोटा सापडल्याचा प्रकार खंडवा येथील रस्त्यावर काही दिवसांपुर्वी घडल्याने लोकांच्या मनात पुन्हा भिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

खंडवा जिल्ह्यातील पंधाना तहसीलच्या आरुद गावात सोमवारी ही आश्चर्यकारक घटना उघडकीस आली. सकाळी सात वाजता कालू मच्छीमाराचा मुलगा तलावावर मासेमारी करायला गेला, त्यावेळी त्याच्या जाळ्यात काही नोटा अडकल्याचे लक्षात आले. या भिजलेल्या नोटा त्याने घरी आणल्या. परंतु त्याच्या वडिलांनी या नोटा बनावट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार त्यांनी गावकऱ्यांना सांगितल्यावर पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे बंडल स्वच्छ केले व ते त्यांच्या ताब्यात घेतले.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी आणखी एक घटना घडली की सोमवारी पहाटे सहा वाजता या तलावाजवळ एक तवेरा गाडी थांबली आणि त्यातून दोन लोक बाहेर आले. दोघांनी बंडल तलावात फेकले व तेथून निघून गेले. यावेळी तेथे गावातील लोक जमले होते आणि या नोटांविषयी चर्चा करीत होते. तलावाव्यतिरिक्त, या नोटा आसपासच्या झुडुपांमध्ये देखील विखुरलेल्या पाहिल्या मिळाल्यात.

या नोटा कोणी फेकल्या आणि का, याचे उत्तर अद्याप सापडले नाही. आता आरुद गावात सापडलेल्या या नोटादेखील पोलिसांसाठी एक आव्हान बनल्या आहेत. यापैकी काही नोटा या जाळल्या आहेत. मात्र, असा प्रकार दोनदा घडल्याने पोलिसांसह गावकऱ्यांची चिंता वाढली असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.


बाजारात आली कोरोना हेअर स्टाईल, पहा फोटो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -