संतापजनक! वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून बेरोजगार मुलाने केली हत्या

वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे मुलांनी वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण दिल्लीत घडली आहे.

murder

सेवानिवृत्त झालेल्या वडिलांकडे बेरोजगार असलेल्या मुलांनी पैसे मागितले. मात्र, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे मुलांनी वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण दिल्लीत घडली आहे. यामध्ये ६१ वर्षाच्या मनोहर या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. तर मुलगा बलवान उर्फ विक्की (२९) या पोलिसांनी हत्येप्रकरणी त्याला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीच्या फतेहपुर बेरी पोलीस ठाण्याच्या जौनपूर भीम वस्तीत ६१ वर्षाचे मनोहर राहत होते. ते एमसीडीमधून निवृत्त झाले होते. तर त्यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन देखील झाले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि चार नातवंडे राहत होती. मुलाला नोकरी नसल्यामुळे त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. त्यामुळे वडिल, मुलगा आणि नातवंडे राहत होती.

दरम्यान, रविवारी रात्री विक्की यांनी वडिलांकडे पैसे मागितले. परंतु, पैसे देण्यास वडिलांनी नकार देत तू कामधंदा करत नसल्याचे त्याला सुनावले. त्यानंतर मुलांनी देखील तुम्ही छतरपूरमध्ये राहणाऱ्या कोणत्या तरी महिलेसोबत बोलतात. तिला पैसे असा त्यानी वडिलांवर आरोप केला. यामुळे त्यांच्यात वादविवाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात चाकू घुसवत त्यांची हत्या केली. त्यात ते रक्तबंबाळ झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या दरम्यान मुलाने वडिलांचा खून केल्याचे उघड झाले. तसेच घटनेवेळी आरोपी मुलगा दारुच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – 25 हजारांना रेमडेसिवीर विकणारा डॉक्टर जाळ्यात