Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देव तारी त्याला कोण मारी, १८ व्या मजल्यावरून पडूनही चिमुकला बचावला

देव तारी त्याला कोण मारी, १८ व्या मजल्यावरून पडूनही चिमुकला बचावला

Subscribe

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय चीनमधील हुबई प्रांतातील शियांगयांग शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाला आला आहे. सहा ऑगस्ट रोजी या कुटुंबातील ४ वर्षांचा चिमुरडा खेळताना १८ व्या मजल्यावरून खाली पडला. पण अहो आश्चर्यंम तो त्यातून बचावला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.या घटनेने डॉक्टरही चक्रावले असून हा चमत्कार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या चिमुरड्याचे आईवडील दुसऱ्या शहरात नोकरी करतात. यामुळे तो आजीसोबत शियांगयांग शहरात राहतो. ६ तारखेला आजी सामान घेण्यासाठी दुकानात गेली होती. त्यामुळे मुलगा घऱात एकटाच होता. खेळता खेळता तो बाल्कनीतील कठड्यावर चढला पण तोल गेल्याने तो १८ व्या मजल्यावरून खाली पडला. पण थेट खाली न पडता तो इमारतीच्या आवारातील एका झाडावर तो आदळला व नंतर खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. मुलगा पडल्याचे बघताच तेथे असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर काही वेळाने आजी घरी येताच तिला याबद्दल कळाले आणि तिला जबर मानसिक धक्का बसला.

- Advertisement -

नंतर मुलाच्या आईवडिलांना याबद्दल कळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. सहा विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. १८ व्या मजल्यावरनं पडूनही तो बचावल्याने
डॉक्टरांनी आश्चर्यं व्यक्त केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -