घरदेश-विदेशBoycott China नावापुरतेच, भारतीय बाजारपेठांत वाढली चीनची भागीदारी

Boycott China नावापुरतेच, भारतीय बाजारपेठांत वाढली चीनची भागीदारी

Subscribe

भारतीयांचा रोष कमी झालेला दिसत असून चीनने पुन्हा भारतीय बाजारपेठांमध्ये भागीदारी वाढवत एन्ट्री केली आहे.

भारत व चीन मधील सीमावाद हा तसा जुनाच. पण गेल्यावर्षी दोन्ही देशांमधील सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. त्यानंतर भारतीयांचे देशप्रेम उफाळून आले व संपूर्ण देशाने Boycott China अभियानच सुरु केलं. यात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला. रोषात भारतीयांनी काही ठिकाणी चीनी वस्तूंची तोडफोडही केली. पण आता भारतीयांचा हा रोष कमी झालेला दिसत असून चीनने पुन्हा भारतीय बाजारपेठांमध्ये भागीदारी वाढवत एन्ट्री केली आहे.

प्रत्यक्षात २०२० मध्ये एकीकडे भारतात Boycott China मोहिम सुरू असतानाच देशात दुसरीकडे मात्र चीनी वस्तूंची मागणी वाढली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० च्या आकडेवारीनुसार चीनची भारतातील आयात ३.३ टक्क्यांनी वाढली . तर भारताच्या निर्यातीमध्ये चीनचा टक्केवारी २.५ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे. ही माहिती देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे याचकाळात दोन्ही देशांमध्ये कपडे, ऑर्गेनिक केमिकल, केमिकल, वैद्यकीय उपकरणं व उत्पादनांची देवाण घेवाण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात ज्यावेळी भारताचे सर्व आयात व्यवहार जवळजवळ ठप्प झाले होते तेव्हा चीनबरोबरोबर मात्र भारताचा व्यवहार वाढले होते. २०२० एप्रिल-नोव्हेंबरमध्ये भारताबरोबर सर्वाधिक आयात व्यवहार झालेल्या टॉप ५ देशांमध्ये चीनचा प्रथम क्रमांक असून अमेरिका, युएई, हॉंगकॉंग आणि सौदी अरब या देशांचा समावेश आहे.

- Advertisement -

लोकसभेत भारत व चीनमधील व्यावहारिक संबंधावर बोलताना केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी चीनवर अवलंबून असलेले व्यवहार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, याआधीही भारत सरकारने चीनच्या भारतातील गुंतवणूकीवर निर्बंध आणले होते. ज्यामुळे कुठल्याही भारतीय कंपनीत जर चीनला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी त्याला भारत सरकारची परवानगी मिळवणे गरजेचे असेल.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -