Pulwama Attack – जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार टाका – मनिषा कायंदे

भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केली आहे. दोन वर्ष काश्मीर येथील पर्यटनावर बंदी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

manisha
शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे (फोटो सौजन्य-एएनआय)

भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध सर्वत्र होत आहे. देशातील सर्व राजकीय पक्ष पाकिस्तानवर बंदी टाकण्याची मागणी करत आहेत. दरम्यान शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी जम्मू-काश्मीर येथील पर्यटनावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. दोन वर्षांसाठी ही बंदी टाकण्याची मागणी कायंदे यांनी केली आहे. देशातील बहुसंख्य नागरिक जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी जातात. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी लोकांनी जाऊ नये असे आवाहन कायंदे यांनी केले आहे. वृत्तसंस्था एनएनआयशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे. पर्यटनाचा आर्थिक फायदा जम्मू-काश्मीरच्या स्थानिक लोकांना होतो. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या पर्यटनावर बहिष्कार टाकणे गरजे असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने देखील पाकिस्तानी कलाकार आणि कपड्यांवर बहिष्कार टाकला आहे.

“पर्यटनाचा फायदा तेथील स्थानिक रहिवाशांना होतो. जर कमावलेल्या पैशाचा वापर देशा विरुद्ध आणि जवानांवर हल्ल्यासाठी होत असेल तर पर्यटनावर बहिष्कार टाकणे आवश्यक आहे. पर्यटनावर पुढील दोन वर्षे बहिष्कार टाकणे आवश्यक आहे.” – मनिषा कायंदे, शिवसेना आमदार

चीनवरही बहिष्कार

चीनच्या मदतीने पाकिस्तान दहशतवादी हल्ले घडवूण आणत असल्याचा दावा येत आहे. पाकिस्तानला चीन कडून आर्थिक मदत मिळत असल्याने पाकिस्तान हे दहशतवादी हल्ले घडवून आणतो. यामुळे देशात चीनी मालावरही बहिष्कार आणण्याची गरज असल्याचे कायंदे यांनी यावेळी सांगितले आहे.