Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeताज्या घडामोडीBoycottIndia : बांगलादेशातील भारतावरील बहिष्कारावर शेख हसीनांचे आक्रमक उत्तर, म्हणाल्या - मग साड्या जाळून टाका

BoycottIndia : बांगलादेशातील भारतावरील बहिष्कारावर शेख हसीनांचे आक्रमक उत्तर, म्हणाल्या – मग साड्या जाळून टाका

Subscribe

सोशल मीडियावर सध्या BoycottIndia हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये विरोधी पक्षाने भारतावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू आहे. भारताने बांगलादेशच्या राजकारणावर दबाव आणल्याचा आरोप या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे.

मुंबई : सोशल मीडियावर सध्या BoycottIndia हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये विरोधी पक्षाने भारतावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू आहे. भारताने बांगलादेशच्या राजकारणावर दबाव आणल्याचा आरोप या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे. मात्र बांगलादेशमधील विरोधकांच्या या BoycottIndia मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. (BoycottIndia First Burn Your Wives Sarees Bangladesh Pm Sheikh Hasina Questions Oppositions)

नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात भारताच्या कथित हस्तक्षेपाला विरोध करण्यासाठी बीएनपीचा BoycottIndia ट्रेंड सुरू झाला आहे. बीएनपीकडून BoycottIndia मोहिमेला वेग आला असून मोहिमेसाठी सुरू करण्यात आलेल्या काही ट्वीटमध्ये युट्यूब व्हिडीओच्या क्लिप शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारताने बांगलादेशच्या निवडणुकीत मागील 15 वर्षांपासून हस्तक्षेप आणि प्रभाव पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका वृत्तवाहिनी दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भाषणादरम्यान विरोधकांच्या भारत बहिष्कार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान हसीना शेख यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाला भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातल्याप्रकरणी सुनावले होते.

याशिवाय, बीएनपीचे नेते भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा सल्ला देत आहेत. पण विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तसेच, बहिष्कार घालणाऱ्या लोकांच्या पत्नींकडे ज्या भारतीय साड्या आहेत? त्या साड्या घेऊन जाळत का नाहीत? असाही सवाल सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, शेख हसीना यांच्या नेतृत्त्वाखालील बांगलादेशचे भारताबरोबर चांगले संबंध आहेत. यावर्षी हसीना यांनी पाचव्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.


हेही वाचा – Mukhtar Ansari : मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ म्हणतो – कहानी खत्म नहीं हुई, शुरू हुई है…