गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी लावल्या मेणबत्या, घराची झाली राख

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी मेणबत्या लावणे पडले महागात.

boyfriend accidentally burns down his flat while proposing to girlfriend for marriage
गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी लावल्या मेणबत्या, घराची झाली राख

एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम सांगणे फार कठिण असते. कारण येणारे उत्तर पॉझिटिव्हच असेल हे काही सांगता येत नाही. तर बऱ्याचदा प्रपोज करुन चांगली मैत्री देखील तुटते. त्यामुळे अनेक जण वेगवेगळे फंडे वापरु प्रपोज करतात. परंतु, कधी कधी प्रपोज करताना गडबड होते आणि मग त्याचा अनेकांना त्रास देखील होतो. असाच एक प्रकार इंग्लंडमधील शेफिल्ड शहरात घडला आहे.

रोमँटिक प्रपोज पडले महागात

शेफिल्ड शहरातील एका व्यक्तीने गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी रोमँटिक वातावरण निर्माण केले आहे. यासाठी त्याने फ्लॅटमध्ये १०० टीलाइट कँडलने रोषणाई केली. पण, या मेणबत्त्यांनी घराला आग लागली आणि घराची अक्षरश: राख झाली.

साउथ यॉर्कशायर फायर And रेस्क्यू सर्व्हिसने ट्विरवर या घटनेची माहिती दिली. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, ‘लक्ष देऊन बघा. काय झाले आहे ते. घराची अक्षरश: राख झाली आहे’. मात्र, या घटनेमुळे इतरांना देखील शाहणपणे येईल. तसेच मेणबत्तीचा वापर कसा करावा आणि करु नये’. हे देखील कळले.


हेही वाचा – ‘रिया चक्रवर्ती कुठे लपली आहे ते मला माहित आहे’, सुशांतच्या वकिलांचा दावा