दुसऱ्यासोबत फोनवर बोलते म्हणून तरुणीला घरात घुसून घातली गोळी

दिल्ली येथील नंद नगरी येथे ही घटना घडली आहे. जखमी तरुणी आईसोबत नंद नगरी येथे राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. जखमी तरुणीचे तरुणासोबत मैत्री होती. कासिम असे त्या तरुणाचे नाव आहे. तो तिच्या शेजारीच राहतो.

नवी दिल्लीः दुसऱ्यासोबत फोनवर बोलते म्हणून एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीच्या घरात जाऊन तिला गोळी घातली. दिल्ली येथे हा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. तरुणीच्या खांद्याला गोळी लागली आहे. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे.

दिल्ली येथील नंद नगरी येथे ही घटना घडली आहे. जखमी तरुणी आईसोबत राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. जखमी तरुणीचे तरुणासोबत मैत्री होती. कासिम असे त्या तरुणाचे नाव आहे. तो तिच्या शेजारीच राहतो. सोमवारी रात्री आठच्या सुमारास तरुणी घरी आली. तेव्हा कासिम तिच्या घरी गेला. तरुणी दुसऱ्यासोबत फोनवर बोलत होती. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातूनच कासिमने तरुणीला गोळी घातली. गोळी तरुणीच्या खांद्याला लागली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ईशान्य दिल्लीच्या डीसीपी जॉय तिर्की यांनी सांगितले की, नंद नगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. १६ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने गोळीबार केला. तरुणीवर गोळीबार करणाऱ्या कासिमला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

माझ्याशिवाय तू कोणासोबत मैत्री करु नकोस असे कासिमने तरुणीला सांगितले होते. घटनेच्या दिवशी याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. कासिमने तरुणीचा मोबाईल घेतला. मोबाईलमधील नावे तपासली. एका नंबरवर तरुणी खूप वेळ बोलत होती. हे लक्षात येताच कासिमने तो नंबर डायल केला. तो नंबर एका तरुणाचा होता. त्यामुळे संतप्त झालेल्या कासिमने तरुणीला गोळी घातली. सुदैवाने तरुणीच्या खांद्याला गोळी लागली.

गोळी लागताच तरुणी जमीनीवर कोसळली.नशेजारच्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कासिम फरार झाला.  पोलिसांनी शोध घेऊन कासिमला अटक केली. तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस कासिमची चौकशी करत आहेत. तरुणाने पिस्तुल आणि काडतूस कुठून आणले?. त्याला ते कोणी दिले?. याची पोलीस चौकशी करत आहेत.