घरदेश-विदेशBPCL Recruitment 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ८७ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती; वाचा सविस्तर

BPCL Recruitment 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ८७ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती; वाचा सविस्तर

Subscribe

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेंतर्गत एकूण ८७ पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांवर भरती होणार आहे. या पदांवर काम करण्याची तुमची इच्छा असेल आणि तुम्ही पात्र उमेदवार असाल तर राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेच्या NATS अधिकृत साइट mhrdnats.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे या शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या ४२ आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीच्या ४५ पदांची भरती केली जाणार आहे. बीपीसीएलच्या मते, १९७३ च्या कायद्यानुसार प्रशिक्षणार्थीचा कालावधी हा साधारण एक वर्षाचा असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी (इंजीनियरिंग) असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून ६.३ सीजीपीए गुण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राज्य तंत्र शिक्षण मंडळ / मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकीमध्ये (इंजीनियरिंग) प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

- Advertisement -

वयाची अट

पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. यासह आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार सवलत देण्यात येणार आहे.

असे होणार सिलेक्शन

बीपीसीएलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पात्रता परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -