घरताज्या घडामोडीखुशखबर! Whatsppवरून बुक करता येणार एलपीजी सिलिंडर

खुशखबर! Whatsppवरून बुक करता येणार एलपीजी सिलिंडर

Subscribe

दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेडने ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. देशभरातील आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एलपीजी बुकिंग करण्याची सुविधा सुरू केली आहे. मंगळवारपासून बीपीसीएलने ही सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहक व्हॉट्सअॅपदच्या माध्यमातून एलपीजी गॅस बुक करू शकतात. देशभरात भारत पेट्रोलियमचे ७१ लाखांहून अधिक एलपीजी ग्राहक आहेत. इतक्या मोठ्या संख्येने ग्राहक असून ती देशातील इंडियन ऑईलनंतर दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

बीपीसीएलने एका निवेदनात म्हटले की, देशभरातील बीपीसीएलचे ग्राहक मंगळवारपासून एलपीजी व्हॉट्सअॅपवर बुक करू शकतात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप बिझिनेस सुरू केले आहे. बीपीसीएल स्मार्टलाईन नंबर १८००२२४३४४ वर एलपीजी व्हॉट्सअॅप बुकिंग करता येईल. हे व्हॉट्सअॅप बुकिंग फक्त ग्राहकांच्या कंपनीत नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून करता येईल.

- Advertisement -

कंपनीचे मार्केटिंग संचालक अरुण सिंह म्हणाले, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एलपीजी बुकिंग करण्याची ग्राहकांना अधिक सोयीस्कर असेल. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत व्हॉट्सअॅप वापरले जाते. त्यामुळे या सुविधेचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.

जेव्हा व्हॉट्सअॅप बुकिंग केले जाईल तेव्हा ग्राहकांना कन्फर्मेशनचा मेसेज येईल. तसेच त्याबरोबर एक लिंक असेल. त्या लिंकवर क्लिक करून ग्राहकांना आपली पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागले. ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंगचे पेमेंट केले जाईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय यासारख्या इतर पेमेंट अॅप्सद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. एलपीजी डिलिव्हरीवर लक्ष ठेवे आणि ग्राहकांकडून त्याबद्दल त्यांचा अभिप्राय घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. येत्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुविधा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अरुण सिंह म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: ‘या’ बोटाची लांबी दर्शवते कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -