घरदेश-विदेशcoronavirus : सोशल डिस्टंसिंग न पाळल्यास हातातील 'ब्रेसलेट' करणार अलर्ट

coronavirus : सोशल डिस्टंसिंग न पाळल्यास हातातील ‘ब्रेसलेट’ करणार अलर्ट

Subscribe

देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. परंतु अनके बाजारपेठांसारख्या ठिकाणी नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंग नियमाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने राज्य सरकारांना लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागला. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णसंख्या रोखण्यासाठी नागरिकांना सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करण्यासाठी मेरठमधील एका शेतकऱ्याचा मुलाने ब्रेसलेटसारखे दिसणारे गॅजेट तयार केले आहे. हे हातातील ब्रेसलेट तुम्हाला सोशल डिस्टिंग न पाळल्यास अलर्ट करणार आहे.

बी-टेकचा अभ्यास करणाऱ्या नीरज उपाध्याय या तरुणीने हे ब्रेसलेट तयार केले आहे. हे ब्रेसलेट घातल्यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर पाळणे सोपे होईल. हे ब्रेसलेट हातात घालणाऱ्या दोन व्यक्ती जरअगदी जवळ आल्या तर त्यांना करंटसारखा थोडा झटका बसेल, त्यामुळे दोघांमध्ये सुरक्षित अंतर पाळावे असे त्यांना अलर्ट केले जाईल. त्यामुळे हे बांगडीचाआकाराचे गॅजेट अनेकांचा फायद्याचे ठरेल असा दावा नीरजने केला आहे.

- Advertisement -

मेरठच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बी-टेकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या नीरज उपाध्याय आणि त्याचा मित्र पंकज चौधरी याने ते ब्रेसलेट कशाप्रकारे कार्य करते याचा डेमो करुन दाखवला. यावेळी दोघांनी हातात ते ब्रेसलेट घातले आणि दोघे तीन- तीन मीटर अंतरावर उभे राहिले तेव्हा त्यांना काहीच जाणवले नाही. परंतु त्या अंतरापेक्षा जवळ आल्यावर दोघांना करंटसारखा हलका धक्का बसला. या ब्रेटलेटला पेटंट करण्याचा त्यांचा मुख्य हेतू आहे. दरम्यान या ब्रेसलेटची किंमत फक्त १३० रुपये असणार असून मोठ्याप्रमाणात याचे उत्पादन झाल्यास किंमत कमी होऊ शकते.

 bracelet will alert follow social distancing rules
coronavirus : सोशल डिस्टिंग न पाळल्यास हातातील ‘ब्रेसलेट’ करणार अलर्ट

यावर ब्रेसलेटवर काम करणारे पुनीत सांगतात, सरकारने सर्व प्रयत्न करूनही लोक सामाजिक अंतर पाळत नसतील तर अशा परिस्थितीत हे डिव्हाइस सामाजिक अंतर पाळण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. जर प्रत्येक व्यक्तीने हे डिव्हाइस हातात घातले तर एकमेकांपासून योग्य अंतर राखणे सोपे होईल. 20 वर्षीय नीरज उपाध्यय मेरठमधील दिल्ली अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचा विद्यार्थी आहे. 2017 मध्ये त्यांनी या संस्थेत प्रवेश घेतला. शेतकरी ओमपाल सिंग यांचा मुलगा नीरजला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. नीरज कुटुंबातील सर्वात धाकटा आहे.

- Advertisement -

Registration for Vaccine १८ वर्षावरील सर्वांना ‘या’ वेळेत मिळणार लस, दोन मिनिटात करा रजिस्ट्रेशन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -