घरट्रेंडिंगकोरोनाची लस घेतली, तर स्त्रियांना दाढी येईल? तुम्ही मगर व्हाल?

कोरोनाची लस घेतली, तर स्त्रियांना दाढी येईल? तुम्ही मगर व्हाल?

Subscribe

आजघडीला सगळं जग कुठल्या गोष्टीची आतुरतेनं वाट पहात असेल, तर ती गोष्ट म्हणजे कोरोनावरची लस. पण जर कुणी म्हटलं, की कोरोनाची लस घेतली तर तुम्ही मगर व्हाल तर? किंवा कुणी म्हटलं, की कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांना दाढी येईल, तर? अर्थात, आपला जरी यावर विश्वास बसला नाही, तरी ब्राझीलचे पंतप्रधान जेअर बोलसोनारो यांचा मात्र यावर दृढ विश्वास बसला आहे. यासंदर्भात त्यांनी जाहीर वक्तव्य देखील केलं आहे. एकीकडे त्यांनी ब्राझीलमध्ये फायझर कंपनीच्या कोरोना लसीच्या व्यापक लसीकरण मोहिमेची घोषणा केलेली असताना दुसरीकडे अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे ब्राझीलच्या जनतेमध्ये आणि कोरोना लसीची वाट पाहाणाऱ्या बाधितांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

नेमकं काय म्हणाले बोलसोनारो?

ब्राझीलमधल्या व्यापक लसीकरणाची घोषणा केल्यानंतर काही दिवसातच बोलसोनारो यांची हे वक्तव्य आलं आहे. ‘तुम्ही जर कोरोनाची लस घेतली, तर त्यानंतर होणाऱ्या परिणामांसाठी ब्राझील सरकार जबाबदार राहणार नाही. जर ही लस घेतल्यानंतर तुम्ही मगर झालात किंवा लस घेणाऱ्या महिलांना दाढी आली, तर ती सर्वस्वी त्यांची जबाबदारी असेल’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

बोलसोनारो यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला कोरोनाच्या लसीची गरज नाही, असं म्हणून वाद निर्माण केला होता. ‘मला स्वत:ला कोरोना झाला आहे. पण मी कोरोनाची लस टोचून घेणार नाही. कारण कोरोनाशी लढा देण्यासाठी माझ्या शरीरात अँटिबॉडीज आहेत. मग कशासाठी मी कोरोनाची लस टोचून घेऊ?’ असा सवालच त्यांनी जाहीररीत्या उपस्थित केला होता.

- Advertisement -

बोलसोनारो यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ सुरू झाला आहे.

मगरमछ के आँसू…!

आधी जीव महत्त्वाचा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -