Breakfast : इंधन दरवाढीमुळे ब्रेड महागला; खव्वयांचे बजेट कोलमडले

दरम्यान, या महागाईच्या दुनियेत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलाय. त्यातच आता ब्रेडच्या किमतीत वाढ झाल्याने खवय्यांचे बजेट कोलमडलेय. मुंबईत अनेक जण म्हणजे तो शाळकरी मुलांचा वर्ग असो वा नोकरदार वर्ग असो ब्रेडने बनलेल्या वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊन पोट भरत असतो.

Breakfast Rising fuel prices make bread more expensive food lover budget collapsed
Breakfast : इंधन दरवाढीमुळे ब्रेड महागला; खव्वयांचे बजेट कोलमडले

सकाळी नाश्ता म्हटलं की त्यात बऱ्याचदा ब्रेड असतोच. त्यात प्रत्येक खवय्यांच्या जिभेवर रेंगाळणारी चवही वेगळी असते. सकाळ झाली की खवय्यांना चहा आणि त्यासोबत गरमागरम नाश्ता हा लागतोच. हल्ली शिरा, उपमा, पोहे या पदार्थांसोबत सकाळच्या नाश्त्यात भर पडली आहे ती ब्रेडची. मग हा नाश्ता ब्रेड बटर असो किंवा ब्रेड ऑम्लेट असो नाहीतर सँडविच. ब्रेडशिवाय मुंबईकरांचा नाश्ता अपूर्णच आहे.

दरम्यान, या महागाईच्या दुनियेत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसलाय. त्यातच आता ब्रेडच्या किमतीत वाढ झाल्याने खवय्यांचे बजेट कोलमडलेय. मुंबईत अनेक जण म्हणजे तो शाळकरी मुलांचा वर्ग असो वा नोकरदार वर्ग असो ब्रेडने बनलेल्या वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊन पोट भरत असतो.

ब्रेडचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढले

इंधन दरवाढीमुळे स्लाईस ब्रेडच्या किमती आता 2 ते 5 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. सर्व कंपन्यांच्या ब्रेडचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आलेत. इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढीचा परिणाम आता ब्रेडच्या किमतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. साध्या ब्रेडप्रमाणेच ब्राऊन ब्रेड 3 ते 5 रुपयांनी महाग झालाय. महागाईमुळे सर्वसामान्यांना आहे त्या गोष्टीत समाधान मानावे लागत असून, आता या महागाईची झळ सर्वसामान्यांच्या प्रामुख्याने खवय्यांच्या खाण्या-पिण्यावर होत आहे.

45 रुपयांचा ब्रेड आता 50 रुपयांवर

व्हिब्स, ब्रिटानिया यांसारखे ब्रेड आता महागलेत. 45 रुपयांचा ब्रेड आता 50 रुपयांवर पोहोचलाय. साहजिकच ब्रेडचे दर वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम ब्रेडपासून तयार होण्यार पदार्थांवर होत आहे. मुंबईत अवघ्या 20 ते 25 रुपयांचे सँडविच खाऊन पोट भरणाऱ्या खवय्यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

हेही वाचा – Corona Third Wave In India: कोणकोणत्या राज्यांमध्ये काय आहेत निर्बंध? जाणून घ्या सविस्तर