जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधअये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज मंगळवारी (5 डिसेंबर) भरदिवसा घडली. या घटनेतील आरोपींचा तपास सुरू असून, हत्या करणाऱ्यारे हे चार जण असल्याची माहिती आहे. (Breaking News Karni Sena National President Gogamedi killed in broad daylight Bullets fired by bikers)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव गोगामेडी यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी गोगामेडी यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेच्यावेळी गोगामेडीसोबत उपस्थित असलेले अजित सिंह गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुखदेव सिंह गोगामेडी हे मंगळवारी दुपारी 1.45 च्या सुमारास श्याम नगर जनपथ येथील घराबाहेर उभे होते. यावेळी एका स्कूटरवरून दोन जण आले. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. माहिती मिळताच श्यामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
#WATCH राजस्थान: राष्ट्रीय राजपूत करणी सेना के राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेड़ी की जयपुर में अज्ञात बाइक सवार अपराधियों ने गोली मारकर हत्या कर दी। अस्पताल में उन्हें डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/uu8g0bg2vf
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2023
हेही वाचा : Pune Lok Sabha : काँग्रेसचे दोन नेते मैदानात; एकाचे भावी खासदार म्हणून बॅनर्स तर,…
सुखवीर सिंग गोगामेडी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटना घडलेल्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुखवीर सिंह गोगामेडी यांच्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. जयपूर येथील सुखवीर सिंग यांच्या घराजवळ चार अज्ञात हल्लेखोर येऊन त्यांनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा : Uddhav Thackeray : एकच निवडणूक बॅलेट पेपर घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान
सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच श्याम नगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, श्यामनगर येथील दाना पानी रेस्टॉरंटच्या मागे ही घटना घडली. या घटनेआधी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपत नेहराने गोगामेडी यांना यापूर्वीही धमकी दिली होती. त्या अंगानेसुद्धा तपास केल्या जात आहे.