घरताज्या घडामोडीLive Update: पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत

Live Update: पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत

Subscribe

अचानक आलेल्या पावसाचा मध्य रेल्वेवर परिणाम झाला आहे. ओव्हरहेड वायरमुळे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन ते इगतपुरी रेल्वे स्टेशन दरम्यान पॉवर सप्लाय नसल्यामुळे अप आणि डाऊन रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच एरोली स्टेशनच्या समोर ठाण्याला जाणाऱ्या दिशेला रेल्वे विद्युत वाहक तारांवर वीज पडल्याने हार्बर लाईनवर वाशी कडून ठाण्याला जाणाऱ्या लोकल ट्रेन ठप्प झाल्या आहेत.


लखीमपूर प्रकरणावरून येत्या ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद होण्याची शक्यता आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आला. सर्व मृतांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक आरोपांवर आता समीर वानखेडे बोलण्याची शक्यता आहे.


ड्रग्ज पार्टी प्रकणात नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केला आहे. आर्यनला नेणारा व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी नव्हता असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. क्रूझवर कोणतेही ड्रग्ज सापडले असल्याचा मोठा आरोप त्यांनी केलाय.

- Advertisement -

आज एकनाथ खडसे यांना पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. खडसे आजारी पडल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. एका क्रिटीकल ऑपरेशनसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.


मुंबईच्या मुंबा देवी मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उद्यापासून राज्यातील मंदिर लोकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. सर्व भक्तांना मंदिर ट्रस्टच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर प्री-बुकिंगद्वारे दर्शनासाठी परवानगी दिली जाणार आहे,असे मंदिराकडून सांगण्यात आले आहे.


देशात १८,८३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर देशात सध्या २,४६,६८७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


झेडपी निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. धुणे, नंदुरबार,अकोला,वाशिम आणि नागपूर या सहा जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला होता मात्र य
यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियमांचे पालन करुन शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.


झेडपी निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून एकूण झेडपीच्या ८५ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. धुणे, नंदुरबार,अकोला,वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे.


राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. धुणे, नंदुरबार,अकोला,वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूकांचा निकाल आज जाहीर होईल.


घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. टस्थापनेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असणार आहे. रोज 10 हजार भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहे. त्यातील 5 हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेता येईल. तर 5 हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळणार आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. क्युआर कोड दाखवल्यानंतर शरीराचे तापमान व्यवस्थित असेल आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -