घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात ५ हजार ६०९ कोरोनाबाधितांची नोंद, ७ हजारहून अधिक रुग्णांची...

Live Update: राज्यात ५ हजार ६०९ कोरोनाबाधितांची नोंद, ७ हजारहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

Subscribe

Maharashtra Corona Update : राज्यात ५ हजार ६०९ कोरोनाबाधितांची नोंद, ७ हजारहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

आज ७,७२० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६१,५९,६७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८ % एवढे झाले आहे. राज्यात ५,६०९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज १३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९९,०५,०९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६३,४४२ (१२.७५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात २३० कोरोनाबाधितांची नोंद, ५ रुग्णांचा मृत्यू

२४ तासात बाधित रुग्ण – २३० २४ तासात बरे झालेले रुग्ण – ४०३ बरे झालेले एकूण रुग्ण – ७१५७९२ बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ३७८२ दुप्पटीचा दर- १७१२ दिवस कोविड वाढीचा दर (३ ऑगस्त ते ९ ऑगस्त)- ०.०४%

- Advertisement -

राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरु, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी


दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना बुधवार पासून मिळणार पास, १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी


खासदार प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना ओबीसींचे अस्तित्वात असणारं आरक्षण ठाकरे सरकारमुळे गेलं असल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे.


आयुर्वेदाचार्य श्रीगुरु बालाजी तांबे यांचं आज निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


अकरावी प्रवेशासाठीची CET परीक्षा हायकोर्टाने रद्द केली आहे. दहावीच्या गुणांनुसार अकरावीचे प्रवेश करा, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.


चंदनाचा पाट, सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही, खायचं काय?; विनायक राऊतांचा केंद्रावर हल्ला

 केंद्र सरकारने सादर केलेलं १०२ वं घटना दुरुस्ती विधेयक अपूरं आहे. हे विधेयक म्हणजे सोन्याचं ताट आहे. चंदनाचा पाट आणि सोन्याचं ताट दिलं. पण ताटात काहीच नाहीये. मग खायचं काय?, या विधेयकानं जर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली जात नसेल तर वंचितांना आरक्षण कसं मिळणार?, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला.


मंत्रालयात दारुच्या बाटल्या; राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे चौकशीचे आदेश

ज्याचा कारभार जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात पुन्हा एकदा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. मात्र मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असतानाही या बाटल्या येतात कशा असा प्रश्न आहे. दरम्यान, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी चौकशीचे आदेस दिले आहेत.


१२७ व्या घटनादुरुस्तीला शिवसेना, काँग्रेसचा पाठिंबा, ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा उठवा, काँग्रेसची मागणी


ओबीसी जनमोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना 4 पानी निवेदन

ओबीसी जनमोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना ४ पानी निवेदन

कर्नाटक तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसींची महाराष्ट्रात जातनिहाय जमगणना करावी

राजकीय आरक्षण पुर्ववत होईपर्यंत कोणतीच स्थानिक स्वराज्य निवडणुक होऊ नये

महाज्योती अर्थसहाय्य, ओबीसी अधिकारी प्रवर्गनिहाय श्वेतपत्रिका, वसतीगृहे, १०० बिंदू नामावली यांसारख्या १७ मुद्दांचा समावेश


देशात गेल्या २४ तासांत २८ हजार २०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या १४७ दिवसांतील सर्वांत कमी रुग्णांची नोंद आहे. देशात सध्या ३ लाख ८८ हजार ५०८ सक्रिय रुग्ण आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.४५ टक्क्यांच्यावर आहे.


दिल्लीत विरोधी पक्षाची होणार बैठक होणार आहे. मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात बैठक, मराठा आरक्षणासर इतर मुद्द्यांवर होणार चर्चा, शिवसेनेच्यावतीनं संजय राऊत होणार सहभागी


कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज नाशिकमध्ये

काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या ‘व्यर्थ ना हो बलिदान’ कार्यक्रमासाठी  उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज ४ वाजता नाशिकला येणार आहेत. हुतात्मा स्मारक येथे हो कार्यक्रम होणार आहे.


मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचं असलेलं १२७वं घटनादुरुस्ती विधेयक आजच संसदेमध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप खासदारांना उपस्थितीसाठी व्हिप बजावण्यात आला आहे.


महापालिकेच्या १७ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. नालासोपारा पूर्वकडील तुलिंज हॉस्पिटल हे सर्वात मोठे आहे. याठिकाणी ३०० लसींचे डोस सकाळी ८ वाजल्यापासून नागरिकांना मिळणार आहेत. त्यातील १५० पहिल्या डोससाठी, तर १५० दुसरा डोस वाल्या नागरिकांसाठी आहेत. आपणाला लस मिळाली पाहिजे यासाठी नागरिक अन्नपाणी, मुलं-बाळ घरात सोडून, लसीकरण केंद्राच्या समोर रांगेत बसले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -