Live Update : Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात २८९ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update

राज्यात ५,५६० नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर ६,९४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८२ % एवढे झाले आहे. राज्यात आज १६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात २८९ कोरोनाबाधितांची नोंद,

२४ तासात बाधित रुग्ण – २८९

२४ तासात बरे झालेले रुग्ण – ११५७
बरे झालेले एकूण रुग्ण – ७१६९४९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%

एकूण सक्रिय रुग्ण- २९००

दुप्पटीचा दर- १७५५ दिवस
कोविड वाढीचा दर (४ ऑगस्त – १० ऑगस्त)- ०.०४%


१२७ वे घटना दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर


हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मॉलमध्ये दोन डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार

सर्वसामान्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवासाची मुभा, दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना पहिल्या टप्प्यात लोकल प्रवासाची परवानगी (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांची जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका, १०० कोटी वसुली प्रकरणातल अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना तपासयंत्रणेनं केली होती अटक, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


भांडूप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. ६०५ क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसने रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली. या दुर्देवी घटनेत ८२ वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर ६५ वर्षीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत.


बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी राहुरीत रास्ता रोको, पेटा हटवा , बैल वाचवा मागणी करत शेतकरी रस्त्यावर, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी बाजार समितीसमोर रास्तारोको, अहमदनगर मनमाड महामार्ग अडवला, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.


कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर मालगाडीचं इंजिन फेल, वांगणीवरुन दुसरं इंजिन पोहचणार

अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मालगाडीचं इंजिन फेल झाल्यानं ४ लोकलचा खोळंबा

मागील एका तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत


राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होत आहे. आजच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिन देशात साजरा केला जात असताना राज्य सरकार वेगळ्या पद्धतीने साजरा करता येईल याबाबत  महत्त्वाचा निर्णय होईल. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरग्रस्तांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा देखील अपेक्षित आहेत.


भारतात गेल्या २४ तासांत ३८,३५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ३ लाख ८६ हजार ३५१ सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी रेट ९७.४५ टक्क्यां पर्यंत वाढला.


लोकल ट्रेन प्रवासासाठी आजपासून पासेस मिळणार, कुर्ला स्टेशनवर  पासेससाठी रांगा, राज्य सरकारचे अॅप अद्यापही तयार नाही, ऑफलाइन प्रणाली आजपासून सुरू. ११ ऑगस्ट सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत तिकीट काउंटरच्या पुढे बूथ उभारले जातील अशी माहीती. बूथवर प्रवाशांच्या लसीकरणाची स्थिती पडताळून प्रत्येक व्यक्तिला तिकीट काउंटरवर पाठवलं जाणार


मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात असलेलं १२७ वं घटना दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. काल हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं.


केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दुपारी एक वाजता बैठक होणार आहे.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सह केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विकास समितीची होणार बैठक