घरताज्या घडामोडीLive Update : राज्यात गेल्या २४ तासात ६,३८८ नव्या...

Live Update : राज्यात गेल्या २४ तासात ६,३८८ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात ६,३८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ८,३९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

- Advertisement -

दिल्लीच्या नेहरू प्लेसमधील मुळी स्टोरी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या शो रुमला आग लागली असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

उद्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन २ दिवस आढावा घेणार आहेत.


मुंबई महापालिकेची घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहिम योग्य दिशेनं असं हायकोर्ट म्हणालं, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेवर हायकोर्ट समाधानी, घरोघरी लसीकरण मोहीमेतंर्गत अंथरुणांवर खिळलेल्या नोंदणीकृत एक चतुर्थांश जेष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण, ३० जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान ४८८९ पैकी १३१७ नागरिकांना लसी देण्यात आल्याची पालिकेकडनं हायकोर्टात माहिती,


नांदेडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार

नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रसंगावधान राखत पळ काढल्याने त्याचा जीव बचावला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नांदेड भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष सोनू कल्याणकरवर हा गोळीबार करण्यात आला आहे.


१७ ऑगस्टपासून शाळा सुरु होणार नाहीत

शिक्षण विभागाच्या जीआरला सरकारची स्थगिती

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय


मुंबईमध्ये आज आणि उद्या सरकारी केंद्रावर लसीकरण बंद असणार आहे. लसींचा साठा नसल्याने लसीकरण ठप्प झालं आहे.  लोकल पाससाठी दोन डोसची अट असताना लसीकरणाला ब्रेक लागल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे.


इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची आजपासून शिष्यवृत्ती परीक्षा..

दीड वर्षांनंतर मुलं प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी हजर..

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्याना मास्क,सानिटायझर आणि तापमान तपासल्यानंतरच प्रवेश..

दीड वर्षात दोन वेळेस रद्द झालेल्या परीक्षांना अखेर सुरुवात


सोलापुरात आज लसीकरण मोहीम पुन्हा ठप्प झाली आहे. लसींचे डोस संपल्याने लसीकरण ठप्प झालं आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकामचं लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे.


नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणं, जातीवाचक शिवीगाळ करणं आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करीत असून जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा FIR मध्ये उल्लेख आहे. गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्यानं आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याची तक्राप पत्नीनं केली आहे.


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO) सकाळी ५.४३ वाजता EOS-3 उपग्रहाचे लाँचिंग केले. पण हे मिशन यशस्वी झाले नाही. उड्डाण यशस्वी झाले पण उपग्रह योग्य कक्षेत पोहोचला नाही. त्यामुळे हे प्रक्षेपण अयशस्वी झाल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. इस्रोने सकाळी ५.४३ वाजता EOS-03 चे यशस्वी प्रक्षेपण केले आणि सर्व टप्पे त्यांच्या नियोजित वेळेनुसार होत गेले. परंतु शेवटच्या टप्प्यात ईओएस -3 अलग होण्यापूर्वी क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -