घरदेश-विदेशBreaking News: लालकृष्ण आडवाणी यांना 'भारतरत्न' जाहीर; पंतप्रधान मोदींकडून घोषणा

Breaking News: लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर; पंतप्रधान मोदींकडून घोषणा

Subscribe

भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही मोठी घोषणा केली आहे.

मुंबई: भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही मोठी घोषणा केली आहे. लालकृष्ण आडवाणी हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. तसंच, प्रभू श्रीराम मंदिराच्या आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. (Breaking News LK Advani declared Bharat Ratna Announcement by Prime Minister Modi )

लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न देऊन एकप्रकारे केंद्र सरकारने आडवाणींकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा आडवाणींविषयी या सरकारला काही आस्था नाही, असा जो प्रचार विरोधकांनी केला होता, त्याला आत भाजपाने पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं जेव्हा उद्घाटन होतं, त्यावेळी लालकृष्ण आडवाणी हजर राहणार नव्हते, त्याविषयी त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटलं होतं की, नियतीने नरेंद्र मोदी यांना निवडलं आहे. त्यातून दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल असलेला आदर दिसून आला होता. आता केंद्र सरकारनेही त्यांच्या वरिष्ठ नेत्याला भारतरत्न पुरस्कार देत त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना म्हटलं आहे की, मला कळवायला अतिशय आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मी त्यांच्याशीही बोललो आहे. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी भारताच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिलं आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्त्वाचे आहे. त्यांनी गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला होता. राष्ट्रपती भवनातून याबाबत निवेदन जारी करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -