घरदेश-विदेशRajyasabha Election : अभिषेक मनू सिंघवींना नशिबाची हुलकावणी; समसमान मतानंतर नाणेफेकीत काँग्रसचा...

Rajyasabha Election : अभिषेक मनू सिंघवींना नशिबाची हुलकावणी; समसमान मतानंतर नाणेफेकीत काँग्रसचा पराभव

Subscribe

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. 68 आमदारांनी राज्यसेभेच्या एका जागेसाठी मतदान केले. काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना 34-34 मते मिळाली. त्यानंतर नाणेफेक करुन भाजप उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला.

तीन राज्यांच्या 15 राज्यसभेच्या जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशचा समावेश होता. उत्तर प्रदेशात 10, कर्नाटकमध्ये चार आणि हिमाचल प्रदेशात एका जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली.

- Advertisement -

हिमाचलच्या एका जागेसाठी मोठे उलटफेर झाले. हिमाचलमध्ये काँग्रेसचे 40 आमदार आहेत. काँग्रेस उमेदवाराला फक्त 34 मते मिळाली. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहवे लागले. 68 विधानसभा सदस्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान केले. यात काँग्रेस आणि भाजपा उमेदवाराला समसमान 34 मते मिळाली. त्यानंतर नाणेफेक करुन विजयी उमेदवार घोषित करण्यात आला. त्यात काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना नशिबाने साथ दिली नाही आणि भाजपाचे हर्ष महाजन विजयी घोषित झाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. एकूण नऊ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना समसमान मते मिळाली.

हेही वाचा : Nana Patole : लोकसंख्या कमी होत असते की वाढते? ‘आपलं महानगर’च्या वृत्तानंतर पटोलेंनी सरकारला घेरलं

- Advertisement -

काँग्रेसचे एक मत रद्द करण्यावर भाजप आक्रमक

काँग्रसचे एक मत रद्द करावे अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. भाजपच्या पोलिंग एजंटने काँग्रेस आमदार सुदर्शन बबलू यांचे मतदान रद्द करावे अशी मागणी केली. सुदर्शन बबलू हे आजारी आहेत, त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मतदानासाठी आणण्यात आले होते, हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप पोलिंग एजंटने केला. निवडणूक आयोगाने यावर नियमानुसार सर्व स्थिती तपासली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -