Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशBribery case : अदानी प्रकरणातून मार्ग काढता येईल, अमेरिकेने केले आश्वस्त

Bribery case : अदानी प्रकरणातून मार्ग काढता येईल, अमेरिकेने केले आश्वस्त

Subscribe

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत असून आम्ही इतर समस्यांप्रमाणेच या प्रकरणातून देखील मार्ग काढता येईल, याची आम्हाला खात्री असल्याचे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करिन जीन-पियरे यांनी सांगितले.

(Bribery case) वॉशिंग्टन : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची कथित फसवणूक आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे यांसारखे आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने हे आरोप केले आहेत. भारतात यावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच अमेरिकेने मात्र यातून मार्ग काढता येईल, असे सांगत आश्वस्त केले आहे. (The White House clarified that it is aware of the Adani case)

गौतम अदानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केला आहे. याप्रकरणी गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले असल्याचेही सांगण्यात येते. यावरून काँग्रेस आक्रमक झाली असून अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : भाजपाने घेतलेली उडी म्हणजे…, अदानी प्रकरणी ठाकरे गटाचा थेट हल्लाबोल

या पार्श्वभूमीवर गुरुवारी पत्रकार परिषदेत व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करिन जीन-पियरे यांनी पत्रकारांना सांगितले की, अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती प्रशासनाला आहे. आम्हाला या आरोपांची कल्पना असून याबाबत विशिष्ट माहिती पाहिजे असल्यास सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) तसेच न्याय विभाग (DOJ) यांच्याशी संपर्क साधू शकता, असा सल्ला त्यांनी दिला.

- Advertisement -

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत असून आपापसातील संबंधांना धक्का लागणार नाही, हे ध्यानी घेत आम्हाला इतर समस्यांप्रमाणेच या प्रकरणातून देखील मार्ग काढता येईल, याची खात्री असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.

अदानी समूहाने आरोप फेटाळले

अमेरिकेतील कथित लाचखोरीच्या प्रकरमावरून अदानी समूहाने तत्काळ एक निवेदन जारी करत हे सर्व आरोप अमान्य असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाकडून ‘अदानी ग्रीन्स’च्या संचालकांवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून आम्ही ते सर्व आरोप फेटाळत आहोत. अमेरिकेच्या न्याय विभागानेच नमूद केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे तोपर्यंत फक्त आरोप ठरतात, जोपर्यंत ते सिद्ध होत नाहीत. तसेच तोपर्यंत संबंधित आरोपी हा निर्दोषच असतो. या प्रकरणात आम्ही शक्य त्या सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहात आहोत, असे या निवेदनात अदानी समूहाने म्हटले आहे. (Bribery case: The White House clarified that it is aware of the Adani case)

हेही वाचा – Gautam Adani : गौतम अदानींवर आंतरराष्ट्रीय संकट; केनियाने अदानींसोबतचा करार केला रद्द


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -