जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी सदस्य देशांचे प्रमुख उपस्थित राहत आहेत. यावेळी त्या-त्या देशाच्या प्रमुखांभोवती असतो तो सुरक्षेचा गराडा. मात्र, जगातील तिसरी महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनच्या राष्ट्रपतींसोबतच येथे जरा भलतेच घडले आहे. त्यामुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग थोडे चिंताग्रस्त दिसून आले. त्यांची ही चिंतीत छबी कॅमेऱ्यात कैद झाली असून, ती व्हायरल होत आहे. (BRICS: Chinese President’s Security Guards Stopped at Gate; Even Xi Jinping was speechless by the incident)
15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला उपस्थित असून, सोबतच आपल्या शेजारील देश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगही बुधवारी या परिषदेसाठी जोहान्सबर्गमध्ये पोहचले आहेत. मात्र, बुधवारी जेव्हा ते कार्यक्रमस्थळी पोहच होते तेव्हा त्यांच्यासोबतच जरा विपरीत घडले. काय घडले त्यांच्यासोबतच चला जाणून घेऊया.
发生了什么?
中国国家主席习近平在步入会场时,一名手提公文包的中方工作人员试图追赶上他,但是被保安阻拦。pic.twitter.com/Zv8OEIjll4— 李老师不是你老师 (@whyyoutouzhele) August 23, 2023
असे घडले चीनच्या राष्ट्रपतींसोबत, वाचा-
बुधवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी जेंव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष कार्यक्रम स्थळी असलेल्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रोटोकॉल अधिकारी हजर होते. यावेळी अधिकाऱ्यांनी शी जिनपिंग यांच्यासाठी दरवाजा उघडला आणि त्यांना आत जाऊ दिले. शी जिनपिंग कॉरिडॉरमध्ये शिरले, रेड कार्पेटवरून हळू चालत असताना त्यांचा सुरक्षा रक्षक त्याच्या मागून येत होता. मात्र, त्यानंतर अचानक अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद केला. जिनपिंग यांनी मागे वळून पाहिले तेव्हा ते एकटेच होते. ते पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होते तरीही त्याच्या मागे त्यांच्या स्टाफमधील कुणीच दिसत नव्हते. त्यामुळे ते जरा चिंतित दिसत होते. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा : Chandrayan 3 यशस्वी करणाऱ्या ISRO च्या शास्त्रज्ञांना पगार किती? माजी प्रमुखांनी दिली धक्कादायक माहिती
पुढे जिनपिंग आणि मागे दरवाजा बंद
ब्रिक्सच्या कार्यक्रम सभागृहात जाताना चीनच्या राष्ट्रपतींना दक्षिण अफ्रिकेच्या गेट उघडून पुढे जाऊ दिले. जेंव्हा शी जिनपिंग पुढे जात होते तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद केला आणि शी जिनपिंग यांच्या स्टाफला तिथेच थांबवले. त्यामुळे एकटेच चालत जात असलेल्या शी जिनपिंग नेहमी-नेहमी मागे वळून पाहत होते. मात्र, त्यांना मागे कुणीच दिसत नव्हते. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे ‘त्या’ ब्रिटीश पत्रकाराचे तोंड झाले बंद
संशय आल्यामुळे रोखले सुरक्षा रक्षकाना
झाले असे की, कार्यक्रम स्थळी जाणाऱ्या शी जिनपिंग यांच्या सुरक्षा रक्षकांना गेटपर्यंत येण्यासाठी काही सेकंद उशीर झाला. त्यामुळे घाईने शी जिनपिंगपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी ब्रिक्स सुरक्षा रक्षकांना त्यांच्या या कृतीचा संशय आला म्हणून त्यांनी शी जिनपिंगच्या सुरक्षा रक्षकाना गेटवरच रोखून ठेवले होते.
हेही वाचा : Narendra Modi : नवीन सदस्य जोडल्याने BRICS संघटना मजबूत होईल; पंतप्रधान मोदींना विश्वास
हे देश आहेत ब्रिक्सचे सदस्य
जगातील ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका हे देश ब्रिक्सचे सदस्य आहेत. कोरोना महामारीमुळे मागील तीन संमेलन ही व्हर्च्युअल म्हणजे अभासी प्रकारे पार पडले होते. त्यानंतर हे पहिले स्वतः सहभागी होत पार पडत असलेले शिखर संमेलन आहे.