Brics Summit Council : दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) जोहान्सबर्ग (Johannesburg) येथे 15 व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे (Brics Summit Council) आयोजन करण्यात आले आहे. या परिदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांमध्ये पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेसंबंधी (LAC) चर्चा झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग यांना स्पष्टपणे सांगतिले की, चीनला एलएसीचा आदर करावा लागेल. यानंतर जिनपिंग यांनी चीनी सैन्य नियंत्रण रेषेवरून मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. (Brics Summit Council Modi expresses concern over LAC in Ladakh Will the Chinese army withdraw soon)
हेही वाचा – कोविड बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपआयुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स, आज होणार चौकशी
पूर्व लडाखमधील वास्तविक सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये करार झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा (Vinay Mohan Kwatra) यांनी मोदी-जिनपिंग यांच्यातील चर्चेची माहिती देताना सांगितले. ते म्हणाले की, मोदींनी शी जिनपिंग यांच्यासमोर एलएसीच्या पश्चिम क्षेत्रातील विवादित मुद्द्यांवर भारताची चिंता अधोरेखित केली. यावेळी त्यांनी संबंध सामान्य करण्यासाठी तुम्हाला एलएसीचा आदर करावा लागेल आणि दोन्ही देशांमध्ये शांतता आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
#WATCH | Johannesburg, South Africa | Foreign Secretary Vinay Kwatra says, “…It was a conversation with President Xi Jinping and as I said, on the sidelines of the BRICS Summit Prime Minister had interactions with other BRICS leaders. In that conversation with President Xi… pic.twitter.com/7ZKVAhSP7N
— ANI (@ANI) August 24, 2023
मे 2020 मध्ये सुरू झालेल्या पूर्व लडाख सीमा विवादानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. तीन वर्षांहून अधिक काळ भारतीय आणि चिनी सैन्याने येथे काही ठिकाणी अडथळे आणले आहेत, तर दोन्ही बाजूंनी विस्तृत राजनैतिक आणि लष्करी चर्चेनंतर अनेक भागांतून सैन्य मागे घेतले आहे. परंतु अजूनही काही भागात तणाव कायम असल्यामुळे मोदींनी पुन्हा एकदा शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा केली आहे.
हेही वाचा – Rain Update : पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
जोहान्सबर्गमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातील चर्चेदरम्यान भारत आणि चीन यांच्यातील मेजर जनरल स्तरावरील चर्चा गुरुवारी (24 ऑगस्ट) संपुष्टात आली. दौलत बेग ओल्डी आणि चुशूल सेक्टरमध्ये 19 ऑगस्ट रोजी सुरू झालेली ही चर्चा सहा दिवस चालली. दिर्घकाळ चाललेल्या चर्चेत डेपसांग आणि डेमचोक भागांवरील वादाचा विषय होता. परिषद संपल्यानंतर पंतप्रधान मोदी गुरुवारी रात्री उशिरा ग्रीसला रवाना झाले. ते ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी भारत आणि ग्रीस यांच्यातील संबंध सुधारण्याबाबत चर्चा करणार आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालय काय म्हणाले?
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी शुक्रवारी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान शी जिनपिंग यांनी भारत-चीन संबंध सुधारणे हे दोन्ही देश आणि लोकांच्या हितासाठी महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सध्याच्या चीन-भारत संबंधांसह समान हितसंबंधांवर विचार विनिमय केला. दोन्ही देशांमधील संबंध जागतिक आणि प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी पोषक आहेत, यावर जिनपिंग यांनी या बैठकीत भर दिला, अशी माहिती वांग वेनबिन यांनी दिली.