घरदेश-विदेशBRICS देशांच्या बैठकीत आज भारत-चीनचे परराष्ट्रमंत्री आमनेसामने

BRICS देशांच्या बैठकीत आज भारत-चीनचे परराष्ट्रमंत्री आमनेसामने

Subscribe

भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी

लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री चकमक झाली. यावेळी चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा देखील प्रयत्न करण्यात आला. यामुळे भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे.

भारत आणि चीन या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारत आणि चीनचे परराष्ट्रमंत्री आमनेसामने येणार आहेत. BRICS देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये दोघे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर असून ही बैठक होणार आहे.

- Advertisement -

सध्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा उचलून धरला असून दुसरीकडे चीनकडून मात्र भडकाऊ वक्तव्य येत आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या BRICS देशांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष आहे.

लष्करप्रमुख लडाखच्या दौऱ्यावर

या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. चीनसोबत वाढलेल्या तनावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे हे आज फील्ड कमांडर यांच्यासह सैन्य तैनाती आणि अन्य तयारीचा आढावा घेणार आहेत. काल, गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा का आढावा देखील घेणार आहेत. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी  बुधवारी वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता.

- Advertisement -

भारतीय सैन्याने डाव उधळला

लडाखमधील पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, २९-३० ऑगस्टला रात्री अचानक पँगाँग सरोवरच्या भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतरही चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. पण, सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव सातत्याने उधळून लावला.


पबजीसह ११८ चीनी Apps बंदीनंतर ड्रॅगनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -