Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश चक्क लग्नाच्या दिवशी बनवला वर्ल्ड रेकॅार्ड

चक्क लग्नाच्या दिवशी बनवला वर्ल्ड रेकॅार्ड

अशाच एका नववधूची चर्चा सध्या रंगली आहे. तिने आपल्या लग्नाच्या पेहरावाने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

Related Story

- Advertisement -

लग्नामध्ये सर्वांधिक लोकांच्या नजरा असतात ते नवरा आणि नवरी वर,त्यांनी केलेल्या पेहरावावर. तसेच नवरीच्या शॅापिंगची रेल-चेल तर सांगायलाच नको. महागड्या,डिजायनर साड्या,ड्रेस,गाऊन पासून ते अनेक किलो वजनाचा लेहंग्या पर्यंतचा पेहराव बाजारात सहज उपलब्ध होतो.तसेच लग्नाच्या दिवशी नवरीचा थाट काही औरच असतो. अशाच एका नववधूची चर्चा सध्या रंगली आहे. तिने आपल्या लग्नाच्या पेहरावाने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.

- Advertisement -

सायप्रस मधील एका नववधूने चक्क तीच्या लग्नात वेडिंग गाऊन घातला आहे.त्या वेडिंग गाऊन ची वेडींग वेल ७ किलोमीटर लांबीची आहे.


गिनीज वर्ल्ड रेकॅार्ड च्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंट वर या वर्ल्ड रेकॉर्डचे काही व्हिडियो आणि फोटोज शेअर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मारिया परस्केवा असे नवरीचे नाव आहे. सर्वाधिक लांबीच्या वेडिंग वेल चा गिनीज वर्ल्ड रेकॅार्ड बनवनणे हे तिचे लहान असतांनाचे स्वप्न होते असे तिने म्हंटले आहे.

तसेच या वेडिंग वेलला मैदानात व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी ६ तास इतका कालावधी लागला होता. यादरम्यान ३० वॅालिंटियर ही तेथे उपस्थित होते.

मारिया परस्केवाच्या वर्ल्ड रेकॉर्डचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.तसेच नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्स चा वर्षाव देखील होत आहे.


हे हि वाचा – GoodNews! ‘या’ कंपनीने तब्बल १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिली एका आठवड्याची भरपगारी सुट्टी!

- Advertisement -