लॉकडाऊन काही संपेना, वधूला धीर धरवेना; सासरी येऊन केले लग्न संपन्न

सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देश लॉकडाऊनमध्ये आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक मोदी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर हा तिनदा हे लॉकडाऊन वाढवण्यात आले. यामुळे एप्रिल, मे महिन्यातील ऐन लग्न सराईत काळात ठरलेल्या लग्नांना मुहूर्त गाठता आला नाही. या परिस्थितीत वाराणसीतील एका वधूने लॉकडाऊनमध्ये धाडस करत आपल्या कुटुंबियांसह सासूरवाडी गाठली. गावच्या पंचायतीसमोर दोन्ही कुटुंबियांच्या साक्षीने मंदिरात सात फेरे घेऊन विवाह केला.

हेही वाचा – Corona: आणखी एक महिना वाढवला; ‘या’ राज्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर

काय आहे प्रकरण 

लॉकडाऊनमुळे एकदा या दोघांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र त्यानंतरही लॉकडाऊन वाढल्यामुळे नवऱ्या मुलीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. वाराणसीतील कपसेठी ठाणे येथील दौलतिया गावात ही अजब घटना घडली. वाराणसीतील बालाजी नगर कॉलनी, भगवानपूरमध्ये राहणारे मुसाफिर सिंग यांची कन्या सुलेखा हिचा विवाह दौलतिया गावातील संदीप कुमार सिंग याच्याशी ४ एप्रिल रोजी करण्याचे योजले होते. मात्र लॉकडाऊनमुळे हे लग्न होऊ शकले नाही. लॉकडाऊन काढल्यानंतर महिन्याभरात लग्नाची पुढील तारीख निश्चित करण्याचा विचार दोन्ही कुटुंबियांनी केला. पुजाऱ्यांनी त्यांना २४ मे चा मुहूर्त काढून दिला. मात्र लॉकडाऊन ४ मुळे २४ मे हा मुहूर्तदेखील गाठता येणार नव्हता, हे नवरीच्या लक्षात आले. अखेर तिने स्वतःच सासूरवाडी गाठली आणि लग्न लावून घेतले.

वर वधू