घरदेश-विदेशसासरच्या लोकांनी नववधूला किन्नर ठरवून सर्वांसमोर केले विविस्त्र, वाचा संपूर्ण प्रकरण

सासरच्या लोकांनी नववधूला किन्नर ठरवून सर्वांसमोर केले विविस्त्र, वाचा संपूर्ण प्रकरण

Subscribe

हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र आजही देशातील विविध भागात महिलांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या घटना समोर येत असतात. देशाच्या राजधानीपासून जवळ असलेल्या आग्र्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

आग्रा – हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र आजही देशातील विविध भागात महिलांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या घटना समोर येत असतात. देशाच्या राजधानीपासून जवळ असलेल्या आग्र्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नवविवाहितेची मुंह दिखाईची रस्म सुरु असताना सासरच्या मंडळींनी तरुणीवर ती किन्नर असल्याचा आरोप केला आणि सर्वांसमोर तिला विवस्त्र करण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

आग्रा येथे लग्नानंतर काहीच दिवसांनी हुंड्यासाठी विवाहितेचा छळ सुरु झाला. माहेराहून बाईक आणि सोन्याची अंगठी आणण्यासाठी नवविवाहितेचा उठता बसता अपमान केला जाऊ लागला. ‘मुंह दिखाई’ साठी आलेल्या पै-पाहुण्यांसमोर सासरच्यांनी तिला किन्नर असल्याचे दुषण लावून सर्वांसमोर विवस्त्र केलं. पोलिसांनी या प्रकरणाची गुरुवारी माहिती मिळाली. पीडितेने पोलिस आयुक्तांकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवविवाहितेने सासरच्या छळाला विरोध केल्यानंतर तिला माहेरी सोडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहाबाद पोलिस स्टेशनंतर्गत राहात असलेल्या या तरुणीचा विवाह २० मे रोजी त्याच भागातील एका तरुणासोबत झाला. नवविवाहित तरुणीचा आरोप आहे की तिच्या कुटुंबाने यथाशक्ती हुंडा दिला. मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवसापासून पती सासू, दिर यांनी हुंड्यात बाईक आणि सोन्याची अंगठी दिली नसल्याचा धोशा सुरु केला. माहेराहून या वस्तू घेऊन येण्यासाठी तरुणीवर दबाव टाकला जाऊ लागला. त्यासाठी तिला मारहाणही करण्यात आली.

नवविहातिचा आरोप आहे की, २४ मे रोजी सासरच्या घरी ‘मुंह दिखाई’ची रस्म आयोजित करण्यात आली होतीत. यावेळी सासरच्या मंडळींनी तिच्यावर किन्नर असल्याचा आरोप केला. सर्व नातेवाईक आणि पुरुषांसमोर ती महिला असल्याचे परीक्षण करण्यासाठी तिला बळजबरीने विवस्त्र करण्यात आले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडितेचा आरोप आहे की विवस्त्र करण्याला तिने विरोध केल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण केली आणि बळजबरीने गाडीत बसवून तिला तिच्या माहेरी नेऊन सोडण्यात आले.

- Advertisement -

पोलिस आयुक्तांनी दिले आदेश 

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार ती जेव्हा माहेरी पोहचली तेव्हा तिची अवस्था पाहून तिच्या आईने सासरच्या लोकांना फोन केला आणि मुलीसोबत असा व्यवहार का केला याची विचारणा केली. त्यावर सासरच्या मंडळींनी तिच्या आईला शिवीगाळ केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिस आयुक्त केशव चौधरी यांनी फदेहाबाद पोलिस स्टेशनला या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -