घरदेश-विदेशBrij Bhushan Singh : अल्पवयीन कुस्तीपटूंचा लैंगिक शोषणाचा आरोप; सचिवांना नोटीस

Brij Bhushan Singh : अल्पवयीन कुस्तीपटूंचा लैंगिक शोषणाचा आरोप; सचिवांना नोटीस

Subscribe

 

नवी दिल्लीः Wrestling Federation of India (WFI) chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर अल्पवयीन कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपाचा खटला नेमका कोणत्या न्यायालयात चालू शकतो याचे प्रत्युत्तर सादर करण्यासाठी The Delhi High Court ने मंगळवारी Registrar General आणि प्रधान सचिवांना नोटीस जारी केली.

- Advertisement -

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपाची सुनावणी दिल्लीतील Rouse Avenue न्यायालयात सुरु आहे. अल्पवयीन कुस्तीपटूंनीही Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानुसार Protection of Children from Sexual Offences Act (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याचा खटला Rouse Avenue न्यायालयात चालू शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. Patiala House court येथे याचा खटला चालू शकतो. त्यामुळे The Delhi High Court ने याची माहिती सादर करण्याचे आदेश Registrar General आणि प्रधान सचिवांना दिले आहेत.

हेही वाचाःWrestlers Protest: एक आरोप जरी सिद्ध झाला तर मी गळफास घेईन; बृजभूषण सिंह यांचा दावा

- Advertisement -

Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जात नव्हता. त्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. Brij Bhushan Sharan Singh यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जावा यासाठी महिला कुस्तीपटूंनी Rouse Avenue न्यायालयात Section 156(3) of the Code of Criminal Procedure (CrPC) अंतर्गत खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. यामध्ये अल्पवयीन व महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा तपशील होता. अतिरिक्त महानगर दंडाधिकारी Harjeet Singh Jaspal यांनी हे प्रकरण Delhi High Court वर्ग केले.

हेही वाचाःमहिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडले, संसद लोकार्पण सोहळ्यावेळी दिल्लीत राडा

Delhi High Court मध्ये न्या. दिनेश कुमार शर्मा यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने Registrar General आणि प्रधान सचिवांना नोटीस जारी करत यावरील सुनावणी ६ जुलै २०२३ पर्यंत तहकूब केली.

दिल्ली न्यायालयाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल २०२३ रोजी Brij Bhushan Sharan Singh यांच्याविरोधात अखेर गुन्हा नोंदवला. पॉस्कोसह विविध कलमे सिंह यांच्यावर लावण्यात आली आहेत. Brij Bhushan Sharan Singh यांच्याविरोधात सात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. याचा गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला.

विनेश फोगाटाचे खेळाडूंवर टीका

ऑलिम्पिक आणि कॉमन वेल्थ स्पर्धेवर सोशल मीडियावर उघड भूमिका मांडणारे भारतातील स्टार क्रिकेटपटू आणि नामवंत खेळाडू कुस्ती महासंघातील लैंगिक शोषणावर गप्प का आहेत?, कोण काहीच का बोलत नाही, असा संतप्त सवाल विनेश फोगाटने केला. संपूर्ण देश क्रिकेटची पुजा करतो. असे असताना भारतीय कुस्ती महासंघात सुरु असलेल्या गैरप्रकाराबाबत कोणीही क्रिकेटपटू काहीच बोलत नाही. आमच्याच बाजूने बोला असं आमचं म्हणणं नाही. पण कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये एवढा तर संदेश तुम्ही देऊ शकता. मला या गोष्टीचंच दुःख आहे की क्रिकेटर, बॅडमिंटनपटू, बॉक्सर किंवा अन्य खेळाडू याविषयी कोणीच काहीही बोलत नाही, अशी खंत विनेश फोगाटने बोलून दाखवली. असं नाही की भारतीय खेळाडू भूमिका मांडण्यात मागे असतात. अमेरिकेतील एका आंदोलनाला भारतीय क्रिकेटर्संनी पाठिंबा दिला होता. मग आमच्या आंदोलनावर बोलण्यात अन्य खेळाडूंना काय अडचण आहे. आमच्या आंदोलनावर बोलू नका असं त्यांना कोणी सांगितलं आहे की ते व्यवस्थेला घाबरतात. आमच्या आंदोलनावर बोलणे कदाचित त्यांच्या प्रतिष्ठेला किंवा त्यांच्या ब्रॅंडला आवडणार नसेल म्हणून ते गप्प आहेत, असे प्रश्न फोगाटने उपस्थित केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -