घर देश-विदेश Brij Bhushan Singh : पीडितांचा पोलिसांनी नोंदवला जबाब; पतंजली आंदोलनात

Brij Bhushan Singh : पीडितांचा पोलिसांनी नोंदवला जबाब; पतंजली आंदोलनात

Subscribe

 

नवी दिल्लीः कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या पीडित महिला कुस्तीपटूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी रॉउज एवन्यू न्यायालयात दिली. दिल्ली पोलिसांनी तपासाचा अंतरिम अहवाल न्यायालयात सादर केला. हा अंतरिम अहवाल तक्रारदारांना देण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी २७ जूनला होणार आहे.

- Advertisement -

Brij Bhushan Sharan Singh यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही करण्यात आली होती. आम्ही Brij Bhushan Sharan Singh यांच्याविरोधात गुन्हा नोंदवणार आहोत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. त्यानंतर याचा गुन्हाही नोंदवण्यात आला. Brij Bhushan Sharan Singh यांना अटक करावी यासाठी आंदोलन करणारे आग्रही आहेत. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत. तर काहीजणांकडून या आंदोलनावर जाणीवपूर्वक टीका केली जात आहे.

कॉंग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. खाप पंचायतही आंदोलकांच्या पाठिशी उभी राहिली आहे. आता तर योगगुरु बाबा रामदेव यांनीही आंदोलकांचे समर्थन केले आहे. Brij Bhushan Sharan Singh यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांना तत्काळ अटक करायला पाहिजे, अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली आहे.

- Advertisement -

Brij Bhushan Sharan Singh यांनी एक व्हिडिओ जारी करत सर्व आरोप फेटाळले आहेत. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला कुस्ती खेळणारा कोणताही मुलगा, मग तो पुरुष पैलवान असो किंवा महिला कुस्तीपटू त्यांना हा ब्रिजभूषण खरच रावण आहे का हे त्याला खासगीत विचारा. तो दुष्ट आहे का? असं विचारा, तुम्हाला सत्य कळेल. हे एक, दोन, चार, सहा, 10 पैलवान सोडले तर कोणाला विचारा की, मी 11 वर्षांत देशाच्या कुस्तीसाठी काय केले नाही? आता आमच्यावर असे आरोप केले जात आहेत, असे Brij Bhushan Sharan Singh यांनी व्हिडिओत म्हटले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ जारी करण्यात आला होता. नंतर तो डिलिट करण्यात आला.

 

- Advertisment -