राज ठाकरेंना विरोध करणारे बृजभूषण सिंह शरयू नदीवर संजय राऊतांना भेटणार

राज ठाकरे यांना विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह आज संजय राऊत यांची शरयू नदीवर भेट घेणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे.

sanjay raut and brijbhushan singh

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्या, १५ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांना विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह आज संजय राऊत यांची शरयू नदीवर भेट घेणार आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहावं लागणार आहे. (Brijbhushan Singh, who opposes Raj Thackeray, will meet Sanjay Raut on the river Sharayu)

हेही वाचा – …तर भाजपनं शरद पवारांना पाठिंबा द्यायला हवा, संजय राऊतांचा सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. पुण्याच्या पत्रकार परिषदेत त्यांनी तशी घोषणा केली होती. मात्र, शस्त्रक्रीया असल्याचे कारण देत त्यांनी अयोध्या दौरा रद्द करून पुढे ढकलला. दरम्यान, राज ठाकरे जोवर उत्तर प्रदेशवासियांची माफी मागणार नाहीत, तोवर त्यांना येथे पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्या धमकीला घाबरून राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंच्या अटक वॉरंटवर सुनावणी पूर्ण, ‘या’ दिवशी येणार निर्णय

राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली. त्यानुसार, ते उद्या १५ जून रोजी अयोध्य दौऱ्यावर जाणार असून सायंकाळी सात वाजता शरयू नदीवर महाआरतीही करणार आहेत.

हेही वाचा -विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात बदल

दरम्यान, अयोध्या दौऱ्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आला असून काल, सोमवारी सायंकाळी दीड हजारांहून अधिक शिवसैनिक ट्रेनने अयोध्येला रवाना झाले. तर, आज संजय राऊत दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले आहेत. आज सायंकाळी ते खासदार बृजभूषण सिंह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बृजभुषण यांनी राज ठाकरेंना काय धमकी दिली होती?

राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाहीत. मनसैनिक अयोध्येत आल्यास त्यांना शरयूत बुडवू अशी गर्जनाही त्यांनी केली होती.

राज ठाकरेंना विरोध, ठाकरे कुटुंबियांना नाही

माझा विरोध राज ठाकरे यांना आहे. त्यांच्या कुटुंबियांना नाही. त्यामुळे राज यांच्या आई, पत्नी किंवा कुटुंबातील कोणीही अयोध्येत आलं तर मी स्वतः त्यांचं आदरतिथ्य करेन. परंतु राज ठाकरे यांना माझा विरोध कायम आहे. माफी मागत नाही तोपर्यंत राज ठाकरेंना विरोध कायम राहील, असंही बृजभूषण सिंह म्हणाले.