partygate scandal : भारत भेटीपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन नव्या आरोपांच्या फेऱ्यात; विरोधकांकडून हल्लाबोल

जॉन्सन पुढील आठवड्यात दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर अहमदाबादला जाणार आहेत.या भेटीमुळे ते गुजरातला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान ठरणार आहेत.

britain pm boris johnson facing new partygate scandal related claims ahead his india visit
partygate scandal : भारत भेटीपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन नव्या आरोपांच्या फेऱ्यात; विरोधकांकडून हल्लाबोल

भारत भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्स यांना सोमवारी पार्टीगेच स्कँडल प्रकरणामुळे नव्या आरोपांना सामोरे जावे लागले आहे. येत्या गुरुवारी ते भारत दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पार्टीगेट स्कँडल हा कोरोना महामारी लॉकडाऊनदरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कार्यकम्रांचे आयोजन केल्याशी संबंधित आहे. मात्र भारत दौऱ्यामुळे जॉन्सन यांना याप्रकरणातून थोडा दिलासा मिळेल, असे मानले जात आहे.

जॉन्सन यांनी कोरोना लॉकडाऊनदरम्यान अशाच पार्टीचे आयोजन केले होते ज्यासाठी त्यांना दंड ठोठावण्याच आला आहे. जून 2020 मध्ये बोरिस जॉन्सन यांच्या वाढदिवशी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी कॅरीने कॅबिनेट रुममध्ये एक केक आणला होता. कोरोना निर्बंध असतानाही या पार्टीत अनेक मंत्री अधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे याप्रकरणी कॅरी आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना दंड ठोठवण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने म्हटले की, नोव्हेंबर 2020 मध्ये 10 डाउनिंग स्ट्रीटवरून कम्युनिकेशन डायरेक्टर ली केन यांच्या सेवानिवृत्तनिमित्त आयोजित पार्टी जॉन्सनच्या सांगण्यावरून करण्यात आली होती. यावरून विरोधकांनी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी करत हल्लाबोल केला. मजूर पक्षाच्या उपनेत्या अँजेला रेनर यांनी म्हटले आहे की, जर नवीन अहवाल बरोबर असेल तर याचा अर्थ पंतप्रधानांनी केवळ पार्टींनाच हजेरी लावली नाही तर एक आयोजित करण्याचाही आग्रह धरला.

ब्रिटिश नागरिकांना उत्तम नेतृत्वाची गरज आहे: अँजेला रेनर

जॉन्सन यांच्यावर प्रत्येकवेळी ब्रिटिश नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप रेनर यांनी केला आहे. जेव्हा ब्रिटनचे लोकं आपले बलिदान देत होते, तेव्हा जॉन्सन कायदा मोडत होते. पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यालयाचा अपमान केला आहे. त्यामुळे आता ब्रिटनच्या नागरिकांना उत्तम नेतृत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. लेबर पार्टीकडे कॉस्ट ऑफ लिविंग संकटाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना आहेत. तर दुसरीकडे टोरीचे खासदार पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा बचाव करण्यात व्यस्त आहेत.

गुजरातला भेट देणारे जॉन्सन हे पहिले ब्रिटनचे पंतप्रधान

जॉन्सन पुढील आठवड्यात दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर अहमदाबादला जाणार आहेत. यादरम्यान ते त्यांचे भारतीय समकक्ष नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि युक्रेन संकटासह आपत्कालीन संबंधांवर चर्चा करतील. या भेटीमुळे ते गुजरातला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान ठरणार आहेत. जॉन्सनचा पहिला भारत दौरा 21 एप्रिल रोजी अहमदाबाद येथून सुरू होणार आहे. यादरम्यान, भारत आणि यूके या दोन्ही प्रमुख उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील.

22 एप्रिल रोजी जॉन्सन मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना होतील. येथे दोन्ही नेते भारत आणि ब्रिटनमधील धोरणात्मक संरक्षण, राजनैतिक आणि आर्थिक भागीदारी यावर सखोल चर्चा करतील. वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या मुक्त व्यापार करार (FTA) चर्चेला पुढे नेण्यासाठी जॉन्सन काम करतील. जॉन्सन यांनी याविषयी म्हटले आहे की, माझी भेट त्या पैलूंवर आधारित असेल, ज्या दोन्ही देशांच्या लोकांसाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत.


​JEE Main 2022 : जेईई मेन परीक्षेच्या तारखेत बदल; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा झाली सुरु