घरदेश-विदेशसीट बेल्ट न लावणं ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांना पडलं महागात; ठोठावला इतका दंड

सीट बेल्ट न लावणं ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांना पडलं महागात; ठोठावला इतका दंड

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 10 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. लँकेशायर पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी कारवाई करत पंतप्रधान ऋषी सुनक यांनी 100 पाँडचे चलन जारी केले. चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावता व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी हा दंड ठोठावला आहे.  याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सुनक यांनी माफी देखील मागितली होती, तरी देखील पोलिसांनी चक्क पंतप्रधानांवरचं दंडाची कारवाई केली आहे.

सरकारमध्ये असताना ऋषी सुनक यांना दंड ठोठवल्याची ही दुसरी वेळ आहे. जून 2020 मध्ये कोरोनादरम्यानच्या लॉकडाऊन काळात तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी यांच्यासह सुनक यांनी पार्टी केल्याबद्दल दंड ठोठवला होता, लॉकडाऊनचे नियम मोडून डाऊनिंग स्ट्रीटमध्ये बर्थडे पार्टीला हजेरीमुळे हा दंड ठोठवला होता.

- Advertisement -

आत्ताच्या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे पंतप्रधान ऋषी सुनक स्वत: गाडी चालवत नव्हते. ते गाडीतील पुढच्या सीटवरही बसले नव्हते. ते मागच्या सीटवर बसून व्हिडीओ काढत होते. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी ब्रिटन पंतप्रधानांचे निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रिटवरून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. सुनक यांनी आपली चूक पूर्णपणे मान्य केली त्याबद्दल माफीही मागितली, ते दंड भरण्यास तयार आहेत. जेव्हा पंतप्रधानांनी हा व्हिडीओ बनवला तेव्हा ते उत्तर इंग्लंडमधील लँकेशायरमध्ये होते.

लँकेशायर पोलिसांनी देखील याप्रकरणी ट्विट केलं आहे. मात्र त्या ट्विटमध्ये त्यांनी पीएम सुनक यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. शुक्रवार, 20 जानेवारी रोजी एका 42 वर्षीय लंडनच्या व्यक्तीला लँकेशायरमध्ये चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावता व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे, असं ट्विट पोलिसांनी केलं आहे.

ब्रिटनमध्ये जर एखाद्या प्रवाश्याने कारमध्ये सीट बेल्ट न लावता प्रवास केल्यास त्याला 10 हजारांचा दंड ठोठावला जातो, पण हे प्रकरण न्यायालयात गेल्यास त्याला 50 हाजारांचा दंड होऊ शकतो.


सुनील धामणेंची हकालपट्टी करा, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा; किरीट सोमय्यांची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -