Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत ब्रिटनचे बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर घोषित; जी-20च्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

ब्रिटनचे बर्मिंगहॅम शहर दिवाळखोर घोषित; जी-20च्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

Subscribe

लंडन : ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले बर्मिंगहॅम दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. 11 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अनावश्यक खर्चांवर निर्बंध घालण्यात आली आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या लोकांचे पगारही रोखले आहेत.

- Advertisement -

बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक नोटीस जारी केली आहे. अब्जावधी रुपयांच्या वार्षिक बजेटमधील तुटीमुळे दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. बर्मिंगहॅम हे 100 हून अधिक नगरसेवक असलेले युरोपमधील सर्वात मोठे स्थानिक कौन्सिल आहे.

हेही वाचा – हिंमत असेल तर देशाचे नाव बदला, ‘या’ नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान

असे का घडले?

- Advertisement -

बर्मिंगहॅम सिटी कौन्सिलने मंगळवारी कलम 114ची नोटीस दाखल केली, ज्यामध्ये म्हटले आहे समान वेतनाच्या दाव्यांच्या सध्याच्या गरीबीसारख्या नकारात्मक आर्थिक परिस्थितीचा परिणाम झाला आहे. त्यानुसार, नव्या समान वेतनाच्या दाव्यांपोटी (equal pay claims) सुमारे 816 दशलक्ष डॉलर्स (67 अब्ज रुपये) ते सुमारे 954 दशलक्ष डॉलर्सची (79 अब्ज रुपये) आवश्यकता आहे. ते अदा करण्यासाठी कौन्सिलकडे पुरेसे संसाधने नाहीत. त्याच वेळी, 2023-24 आर्थिक वर्षासाठी, शहराला आता 109 दशलक्ष डॉलर्सची (9 अब्ज रुपये) तूट होईल, असा अंदाज आहे.

हेही वाचा – मत मागायला येतात त्यांना प्रश्न विचारा… ‘जवान’ चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत ‘आप’चे ट्वीट

ब्रिटनचे पंतप्रधान भारतात

राजधानी दिल्लीत शनिवार (9 सप्टेंबर) आणि रविवारी (10 सप्टेंबर) जी-20 शिखर परिषद होत असून त्यात सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतात दाखल झाले आहेत. यावर्षी भारत जी-20चे अध्यक्षपद भूषवित आहे. या परिषदेनिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देखील भारतात येत आहेत.

- Advertisment -