घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटपोहण्याची हौस किती! दिवसाला ५ लाख भाडं भरून स्विमिंग पूलच घेतला भाड्याने!

पोहण्याची हौस किती! दिवसाला ५ लाख भाडं भरून स्विमिंग पूलच घेतला भाड्याने!

Subscribe

त्यामुळे स्विमिंगसाठी जाता येत नसल्यामुळे सिंगापूरच्या एका व्यक्तीने स्वीमींग पुल चक्क भाड्याने घेतला आहे.

लोकं आपली हौसा भागवण्यासाठी काय काय करतील हे सांगता येत नाही. सॉकडाऊनमध्ये आपली हौस भागवण्यासाठी लोकं वाट्टेल ते करायला तयार असतात. शेवटी हौसेला मोल नाही म्हणतात हेच खरं. सिंगपूरमध्ये तर चक्क एका व्यक्तीने लॉकडाऊनमध्ये आपली हौस भागवण्यासाठी शेजारच्याचा स्विमींग पूल भाड्याने घेतला आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय मोठं पण या स्विमींग पूलसाठी तो जी किंमत मोजत आहे ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

भारताबरोबर जगभरात कोरोना थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन आहे. नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जीम, सिनेमागृह, स्विमींग पूल गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे स्विमिंगसाठी जाता येत नसल्यामुळे सिंगापूरच्या एका व्यक्तीने चक्क ही आयडीया लढवली आहे.

- Advertisement -

आपली हौस भागवण्यासाठी त्याने चक्क शेजाऱ्याचा स्विमिंग पूल भाड्याने घेतलाय. खरतर त्या व्यक्तीला तो पूर्ण बंगलाच भाड्याने घ्यायचा होता. पण त्याच भाडं परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्याने केवळ स्विमिंग पूल तीन महिन्यांसाठी भाड्याने घेतला.

सिंगापूरमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून स्विमिंग पूल असलेली घरे भाड्याने मागणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं यावेळी लेस्टर चेन यांनी सांगितलं. “शेजारचा बंगला का भाड्याने हवाय…सध्याच्या घरात जागा कमी पडतेय म्हणून घर भाड्याने हवंय का… असा प्रश्न ‘सिंगापूर रिअल्टर्स’चे रिअल इस्टेट एजंट लेस्टर चेन यांनी त्या व्यक्तीला विचारला. त्यावर, “मला फक्त स्विमिंग पूल वापरायचाय, त्यासाठीच मला पूल हवाय. कारण, लॉकडाउनमुळे माझा पूल बंद आहे” असे उत्तर त्या व्यक्तीने दिले.

- Advertisement -

स्विमींग पुलची किंमत ऐकलीत का

बंगल्यातील स्विमिंग पूल भाड्याने देण्याबाबत तीन महिन्यांचा करार झाला. दरमहा $7,040 म्हणजे जवळपास पाच लाख 34 हजार रुपये इतकं या स्विमिंग पूलचं भाडं आकारण्यात आलं आहे. या व्यक्तीसाठी त्या बंगल्याचा मुख्य प्रवेश गेट बंदच असेल, पण ‘साइड गेट’द्वारे स्विमिंग पूलमध्ये प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.


हे ही वाचा – हेअर कट बघून कोरोना पडणार संभ्रमात, हरभजनने शेअर केला मजेशीर फोटो!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -