घरदेश-विदेशकोविड पॉझिटिव्ह असूनही खासदाराने ट्रेनमधून केला प्रवास, ३० दिवसांसाठी निलंबित

कोविड पॉझिटिव्ह असूनही खासदाराने ट्रेनमधून केला प्रवास, ३० दिवसांसाठी निलंबित

Subscribe

देशभरात कोरोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढू लागलंय. त्यामुळे वेळीच खबरदारीचे उपाय करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं आहे.

देशभरात कोरोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढू लागलंय. त्यामुळे वेळीच खबरदारीचे उपाय करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं आहे. वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या लोकांना पुन्हा एकदा बुस्टर डोस देण्यात यावा असं WHO ने सूचवलं आहे. मागील काळात कोरोना हाहाकार माजलेला सताना काही लोक हे बेजबाबदारपणे वावरत होती. एका ब्रिटीश महिला खासदाराने कोरोना पॉझिटीव्ह असताना सुद्धा ट्रेनमधून प्रवास केला होता. हे कृत्य आता या महिला खासदाराला चांगलंच भोवलंय.

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात कोविड-19 पॉझिटिव्ह असूनही स्कॉटिश महिला खासदाराने लंडन ते ग्लासगो असा रेल्वेने प्रवास केला होता. द गार्डियनच्या मते, या महिला खासदाराला आता हाऊस ऑफ कॉमन्समधून ३० दिवसांसाठी निलंबीत करण्यात आलं आहे. यूके संसदेच्या मानक समितीने म्हटले आहे की, मार्गारेट फेरीर या ब्रिटीश महिला खासदाराने संसदेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवली आणि कोरोना पॉझिटीव्ह असतानाही रेल्वेने प्रवास करून जनतेला धोका दिला. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मतदानाद्वारे त्यांना शिक्षा देण्याचे मान्य केले. इतकंच नव्हे तर त्यांच्या जागेवर पोटनिवडणूकही होऊ शकते. मार्गारेट या २०१७ च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या.

- Advertisement -

स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या फेरीर यांनी 5,230 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांचे प्रतिस्पर्धी मजूर पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आले. त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा दोष स्वीकारला आणि पक्षाचा व्हिप गमावला. गार्डियनच्या अहवालात पुढे म्हटले आहे की, त्याला २७० तासांच्या सामुदायिक सेवेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा: “हा अहंकार येतो कुठून?”, राहुल गांधींबाबत अमित शाहांची प्रतिक्रिया

- Advertisement -

निलंबनाच्या प्रक्रियेबाबत मीडिया आउटलेटने म्हटले आहे की, हाऊस ऑफ कॉमन्समधून किमान १० दिवस निलंबित केलेल्या कोणत्याही खासदाराला परत बोलावले जाऊ शकते. त्यांच्या मतदारसंघातील नोंदणीकृत मतदारांपैकी किमान १० टक्के मतदारांनी अर्जावर स्वाक्षरी केल्यास पोटनिवडणूक घेतली जाते.

हे ही वाचा: गिरीश बापट यांच्या निधनानंतर नारायण राणेंनी घेतली कुटुंबीयांची भेट

या प्रकरणाची संसदीय मानक आयुक्त डॅनियल ग्रीनबर्ग यांनी चौकशी केली. त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की फेरियरने स्वतःला वेगळे न ठेवता सार्वजनिक हिताच्या आधी आपले वैयक्तिक हित ठेवले होते, असंही बीबीसीच्या अहवालात म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -