Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ब्रिटीश महाराणीचे ९९ वर्षीय पती Prince Philip यांची प्रकृती खालावली; उपचार सुरू

ब्रिटीश महाराणीचे ९९ वर्षीय पती Prince Philip यांची प्रकृती खालावली; उपचार सुरू

Related Story

- Advertisement -

ब्रिटनची दुसरी महाराणी एजिलाबेथ हिचा ९९ वर्षीय पती प्रिन्स फिलिप यांना मंगळवारी अस्वस्थ वाटू लागलं, त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळी प्रिन्स फिलिप यांना खासगी ‘किंग एडवर्ड VII हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती बकिंघम पॅलेसने बुधवारी दिली.

बकिंघम पॅलेसकडून असे सांगण्यात आले की, फिलिप यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून त्यांना दाखल करण्यात आले आहे. फिलिप यांना सध्या काही दिवस रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय देखरेखी आहेत.

- Advertisement -

एडिनबर्गचे ड्यूक म्हणून ओळखले जाणारे फिलिप यांनी २०१७ मध्ये आपल्या सार्वजनिक कर्तव्यांमधून निवृत्ती घेतली. दरम्यान ते कधी कधी क्वचितच लोकांमध्ये दिसायचे. इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावामुळे नुकत्याच झालेल्या लॉकडाऊन दरम्यान लंडनच्या पश्चिमेस विंडसर कॅसल येथे राणीबरोबर प्रिन्स फिलिप राहत होते. तसेच एडिनबर्गचे ड्यूक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचणींनंतर त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचेही समोर आले.


- Advertisement -