घरताज्या घडामोडीवाढत्या शहरीकरणामुळे नव्या आजारांना निमंत्रण; ब्रीटनच्या शास्त्रज्ञांचा दावा

वाढत्या शहरीकरणामुळे नव्या आजारांना निमंत्रण; ब्रीटनच्या शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

अर्बन स्टडीज या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या पत्रकात १९८० पासूनचं वाढतं शहरीकरण आणि दर दशकात पसरणार्‍या एकूण रोगांच्या एकूण भूमिकेचे परीक्षण केलं गेलं आहे.

वेगाने वाढणार्‍या शहरीकरणामुळे जगभरात नवीन आजार उद्भवू लागले आहेत. यूकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हे उघड झालं आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की भविष्यातील साथीच्या आजाराच्या संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याबाबतचीही काळजी घेणं आवश्यक आहे. ब्रीटनच्या लिंकन युनिव्हर्सिटीमधील संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, वेगाने होत असलेल्या शहरीकरणाचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या निसर्गाशी असलेल्या संबंधांवर होतो. अर्बन स्टडीज या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या पत्रकात १९८० पासूनचं वाढतं शहरीकरण आणि दर दशकात पसरणार्‍या एकूण रोगांच्या एकूण भूमिकेचे परीक्षण केलं गेलं आहे.

संशोधकांचे म्हणणं आहे की वेगवान शहरीकरणामुळे, विशेषत: आशिया आणि आफ्रिकेत लोक शहरा बाहेरील उपनगरीय भागात स्थायिक होत आहेत आणि ज्यामुळे शहरी व ग्रामीण वातावरण अस्थिर झालं आहे. अभ्यासामध्ये असंही म्हटलं आहे की अशाप्रकारे शहराबाहेर जाऊन राहणाऱ्या लोकांमुळे नविन रोगांचं संक्रमण होऊ शकतं.

- Advertisement -

हेही वाचा – इस्रोने ‘गगनयान’ मोहिमेसाठी मागितले स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रस्ताव


उपनगरीय भागात राहणाऱ्या लोकांना प्राण्यांपासून मानवांमध्ये होणाऱ्या रोगांचा सर्वात जास्त धोका आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, अशा भागात आरोग्य सुविधांचा अभाव आहे आणि हे भाग सरकारी यंत्रणांच्या नजरेपासून दूर आहेत. संशोधनामध्ये इबोलासारख्या गंभीर रोगाचं उदाहरण दिलं आहे. इबोला हा उपनगरी भागातून सुरू झाला आणि नंतर स्थापित शहरांमध्ये पसरला. विकास, कामगार बाजारपेठेत बदल आणि शहरी विस्तार याशिवाय विकसनशील देशांमध्ये खेड्यांमधून शहरांमध्ये अभूतपूर्व स्थलांतर होत आहे, असं लिंकन युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. संशोधकांचे म्हणणं आहे की वाहतुकीच्या मार्गातील सुधारणांमुळे खेडे, उपनगरे आणि शहरांमध्ये प्रवास करण्याच्या काळात अभूतपूर्व घट झाली आहे. तथापि, सार्वजनिक आरोग्यासाठी आरोग्य केंद्र, स्वच्छ पिण्याचं पाणी याबाबत अद्याप विकास झालेला नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -