घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरमधील एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

जम्मू-काश्मीरमधील एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू

Subscribe

५ ऑगस्ट रोजी काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लँडलाईन, इंटरनेट आणि एसएमएस सुविधा बंद करण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरमधील जनतेला सरकारने नवीन वर्षाची सुंदर भेट दिली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमधील सर्व भागात मोबाइल एसएमएस तसंच हॉस्पिटल्समध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. ५ ऑगस्ट रोजी काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लँडलाईन, इंटरनेट आणि एसएमएस सुविधा बंद करण्यात आली होती. बंदीच्या काही कालावधीनंतर काही भागांमध्ये बंदी शिथील करण्यात आली होती. आणि सेवा हळूहळू पूर्ववत करण्यात आली होती.

कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता ही बंदी शिथील करण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी आधी लँडलाइन सेवा सुरळीत करण्यात आली. त्यानंतर पोस्टपेड मोबाइल फोन सेवा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर जम्मूमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. पण काश्मीरमध्ये ही सेवा अद्यापही बंदच आहे.

- Advertisement -

काश्मीरमध्ये स्वागत

दरम्यान जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री सरकारी शाळा, हॉस्पिटलमध्ये ब्राडबँड सेवा सुरु करण्यात आली आहे. मोबाईल सेवा सुरु करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये याचं स्वागत होत असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा – जम्मू-काश्मिरमध्ये धुमश्चक्री, लष्कराचे २ जवान शहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -