Eco friendly bappa Competition
घर क्राइम बहीण-भावाच्या नात्याला काळीमा; ८ वर्ष करत होता सख्ख्या बहिणीवर बलात्कार

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा; ८ वर्ष करत होता सख्ख्या बहिणीवर बलात्कार

Subscribe

लखनौमध्ये बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. सख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर गेल्या ८ वर्षापासून बलात्कार करीत होता. पीडित बहिणीने पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली. विशेष म्हणजे स्वत:चा मुलगा बहिणीवर बलात्कार करत असल्याची माहिती आईला होती. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना धक्काच बसला.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्तांसह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेच्या आईची आणि भावाची कसून चौकशी केली. यानंतर दोघांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही १६ वर्षांची आहे. पीडितेची आई नर्स म्हणून काम करते. पीडितेचा आरोप आहे की तिचा भाऊ तिच्यावर ८ वर्षांपासून सतत बलात्कार करत होता. पीडितेने भावाला विरोध केला असता पीडितेच्या भावाने तिला पोलिसात तक्रार न देण्याची आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडितेने आपल्या आईकडे तक्रार केली. मात्र, आईने आपल्या मुलीला गप्प राहण्यास सांगितलं आणि आपल्या मुलाचं समर्थन करत राहिली. यानंतर पीडितेने १०९० ला फोन केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

- Advertisement -

माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीस उपायुक्त चारू निगम यांनी पीडितेशी चर्चा केली. त्यानंतर पीडितेने तिच्या आई आणि भावाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत आई आणि भावाला अटक केली आणि पीडितेला बाल संरक्षण गृहात पाठविण्यात आलं. याबाबतचं वृत्त आज तकने दिलं आहे.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -