घर देश-विदेश महाराष्ट्रात येऊन पक्षप्रवेशाची ऑफर देणाऱ्या BRSने नाकारले उपमुख्यमंत्र्याना तिकीट अन् 'ते' ढसाढसा रडले..

महाराष्ट्रात येऊन पक्षप्रवेशाची ऑफर देणाऱ्या BRSने नाकारले उपमुख्यमंत्र्याना तिकीट अन् ‘ते’ ढसाढसा रडले..

Subscribe

झाले असे की, तेलंगणात आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तिकिट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हैदराबाद : पक्षवाढीसाठी आणि महाराष्ट्रातही आपली सत्ता असावी अशी इच्छा मनी बाळगून असलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे के.चंद्रशेखरराव हे महाराष्ट्रात येऊन येथील पक्षातील नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर देत आहेत. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी सगळेच्या सगळे मंत्रीमंडळ घेऊन सक्तीप्रदर्शन केले होते. मात्र, आता त्यांच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असून, याच बीआरएस पक्ष्याने नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राहलेल्या एका नेत्याला आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकिट नाकारले आहे. हे तिकिट नाकारताच तो नेता लहान मुलासारखा ढसाढसा रडला हेही तेवढेच विशेष. (BRS who came to Maharashtra and offered to join the party refused the ticket to the Deputy Chief Minister and they cried)

- Advertisement -

झाले असे की, तेलंगणात आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तिकिट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत घणपूर स्टेशन विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी करणाऱ्या पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या हे चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. ते या विधानसभा मतदार संघासाठी आग्रही होते. मात्र पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला. तिकीट नाकारण्यात आल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) नेते आणि तेलंगणचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या हे सर्वांच्या उपस्थितीत ढसाढसा रडले. तेलंगणात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी आगामी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच बीआरएस पक्षाने 21 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तेव्हा हा प्रकार समोर आला.

हेही वाचा : Stop Raging : आधी काढली होती त्याची नग्न धिंड म्हणूनच घेतली इमारतीवरून उडी; जाधवपूर विद्यापीठातील प्रकार

यामुळे नाकारण्यात आले तिकिट

- Advertisement -

थातिकोंडा राजय्या यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका गावातील सरपंच महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपामुळे पक्षाने त्यांना तिकिट देण्यास नकार दिला आहे. तर पक्षाने घणपूर स्टेशन विधानसभेचे तिकिट कदियम श्रीहरी यांना दिले आहे.

हेही वाचा : Chandrayaan-3 बाबत विक्रम साराभाई यांच्या मुलाने व्यक्त केला आनंद, म्हणाले…

मुख्यमंत्री KCR दोन ठिकाणाहून लढणार निवडणूक

तेलंगणामध्ये सध्या बीआरएस पक्ष सत्तेवर आहे. मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (KCR) हे आगामी निवडणुकीमध्ये 95 ते 105 जागा जिंकू असा निश्चय त्यांनी केला आहे. तर बीआरएस पक्षाच्या यादीनुसार, मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव हे गजवेल (Gajwel), आणि कामारेड्डी (Kamareddy) या दोन ठिकाणाहून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : हृषिकेशपासून सिंगापूरपर्यंत चांद्रयान-3 च्या यशस्वीतेसाठी केली जातेय प्रार्थना, पूजा-अर्चा, होमहवन अन् बरंच काही

105 विधानसभेच्या तर लोकसभेच्या 17 जागा जिंकू

21 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 95 ते 105 जागा तर लोकसभेच्या 17 जागा आमचा पक्ष जिंकणार असल्याचे ते म्हणाले. तर एमआयएमसोबत आमचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहतील असेही ते म्हणाले.

- Advertisment -