घरदेश-विदेशबीएसएनएलने कापले स्वतःच्याच कर्मचाऱ्यांचे कनेक्शन, अडकले १.७६ लाख कर्मचाऱ्यांचे पगार

बीएसएनएलने कापले स्वतःच्याच कर्मचाऱ्यांचे कनेक्शन, अडकले १.७६ लाख कर्मचाऱ्यांचे पगार

Subscribe

भारत संचार निगम लिमिटेड'मधील (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. १.७६ लाख कर्मचाऱ्यांचे पगार थकवले असल्याची माहिती समोर आली आहे.

यावर्षाच्या सुरुवातीलाच भारत संचार निगम लिमिटेड’मधील (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांचा पगार थकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बीएसएनएल नंतर ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ (एमटीएनएल) च्या कर्मचाऱ्यांचाही पगार थकवला होता. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या या दुरसंचार कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. येत्या २० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण १.७६ लाख कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैशाचा गैरवापर केला असल्यामुळे पगार थकवल्याचे कारण समोर येत आहे. मात्र यामाहितीवर अजून कोणीही अधिकृत रित्या वक्तव्य केले नाही. बीएसएनएल चे मॅनेजिंग डायरेक्टर अनुपमा श्रीवास्तव यांनी कर्मचाऱ्यांच्या पगार मिळवण्यासाठी योग्य अटी पूर्ण केल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी 

केरळ, जम्मू-काश्मीर, ओडिशा आणि नवी दिल्लीतील कॉर्पोरेट कार्यालयात वेतनाचे वाटर झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे निधी मागण्यात आला आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या दिवशी बँक खात्यात योतो. मात्र यावेळी पगार न आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. वेळेवर पगार दिला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा स्वर उमटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -