जबरदस्त ऑफर! BSNL ग्राहकांना तब्बल ४ महिने देणार मोफत सेवा!

bsnl revised old tariff plan customer get 5 gb date in 35rs lan
BSNL च्या ३५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ पॅकमध्ये ५ जीबी डेटा

बीएसएनलच्या ग्राहकांसाठी एक खूषखबर आहे. कंपनीने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना तब्बल ४ महिने मोफत सेवा देणार आहे. या ऑफरचा फायदा भारत फायबर ब्रॉडबँड ग्राहकांसोबत लँडलाइन ब्रॉडबँड आणि वायफाय ग्राहकांना देण्यात येणार आहे. पण ज्या ग्राहकांनी ३६ महिन्यांचा प्लॅन सबस्क्राईब केला आहे तेच ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात. तुमचा जर दुसरा एखादा प्लॅन असेल तर या ऑफरचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही.

या ग्राहकांना होणार फायदा

बीएसएनएलचा १२ महिन्याचा प्लॅन घेतल्यास एक महिन्याची सर्विस मोफत दिली जाणार आहे. त्याशिवाय २४ महिन्याच्या मोफत प्लॅनमध्ये तीन महिन्याची सर्विस मोफत दिली जाईल. तर ३६ महिन्याचा प्लॅन घेतल्या चार महिन्याची मोफत सेवा दिली जाणार आहे.

३६ महिन्याच्या प्लॅनमध्ये काय आहे खास

बीएसएनलचे भारत फायबर ब्रॉडबँड कनेक्शन घेतल्यास अमर्याद मोफत कॉलिंग मिळणार आहे. तसेच FUP लिमिटपर्यंत अमर्याद डाउनलोडिंगचा स्पीडही तुम्हाला मिळणार आहे.  त्याचप्रमाणे कोणत्या प्लॅनमध्ये किती डेटा मिळेल ते प्लॅनच्या किंमतीवर अवलंबून असेल. बीएसएनएल वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. अशातच या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि किंमतीमध्ये फरक आहे. कंपनी प्रत्येक प्लॅनमध्ये वेगवेगळ्या सुविधा देत आहे.

जबरदस्त वार्षिक प्लॅन

सुरुवातीला बीएसएनएल वापरकर्त्यांना अमजॉम प्राइमचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात होते. मात्र, कंपनीने आता हे बंद केले आहे. त्याशिवाय बीएसएनएलने २३मेला एक ऑफर सुरू केली आहे, ज्यात वार्षिक योजना घेणारे वापरकर्ते मासिक ९९ रुपयांच्या ईएमआयमध्ये गूगल नेस्ट मिनी आणि गूगल नेस्ट हब १९९ रुपयांच्या ईएमएआयमध्ये ऑफर करत आहेत.


हे ही वाचा – कबीर सिंग बघून ‘तो’ बनला डॉक्टर, अश्लील फोटोवरून महिलांना करायचा ब्लॅकमेल!