घरताज्या घडामोडीUP assembly Election 2022: तिकिट नाकारल्याने BSP कार्यकर्ता ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

UP assembly Election 2022: तिकिट नाकारल्याने BSP कार्यकर्ता ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपूर्वी बसपाचे कार्यकर्ते अरशद राणा आगामी निवडणुकासाठी पक्षाकडून तिकट न दिल्यामुळे ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जस जशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तस तशी पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत बहुजन समाज पार्टीचे (BSP, बसपा) राष्ट्रीय सरचिटणीस सतिश चंद्र मिश्रा यांनी उमेदवारांबाबत संकेत दिले आहेत. यादरम्यान बसपाचे कार्यकर्ते तिकट न मिळाल्यामुळे ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे (BSP leader Arshad Rana cries bitterly for being denied party ticket to contest UP elections). यावेळेस बसपाने वेगळ्या रणनीतिच्या अंतर्गत उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडून विधानसभेच्या जागासाठी सरळ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे.

उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपूर्वी बसपाचे कार्यकर्ते अरशद राणा आगामी निवडणुकासाठी पक्षाकडून तिकट देण्याचा दावा केल्याचे सांगत ढसाढसा रडताना दिसत आहे. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना तिकट न देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत बसपाच्या सुप्रिमो मायवती आणि सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा मैदानात उतरणार नाहीत. ते पक्षाचा निवडणूक प्रचार करतील आणि उमेदवार उभे करणार आहेत.

- Advertisement -

बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा गुरुवारी म्हणाले की, ‘त्यांच्या पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ४०३ विधानसभा जागांमधील ३०० हून अधिक जागांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये जवळपास ९० उमेदवार दलित आहेत.’ ब्राह्मण आणि मुस्लिम उमेदवारांबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘याबाबतची माहिती १५ जानेवारीला पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या जन्मदिवसानंतर सांगितली आहे.’

- Advertisement -

दरम्यान विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०३ जागा आहेत. निवडणुक जवळ येत असल्यामुळे सर्व पक्ष निश्चित अंतिम उमेदवारांची नावे देण्याच्या कामात व्यस्त आहेत. गुरुवारी काँग्रेसने दीडशे उमेदवारांच्या नावाची घोषणा केली, यामध्ये महिला उमेदवारांचा अधिक समावेश आहे. दरम्यान भाजपचे सध्या उमेदवारांची नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीपासून सात टप्प्यात विधानसभा निवडणूक सुरू होणार. १० मार्चला याचा निकाला जाहीर होईल.


हेही वाचा – UP Elections 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी झाली मोठी गर्दी, २५०० सपा कार्यकर्त्यांवर FIR दाखल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -